ETV Bharat / city

Raj Thackeray In Pune : कार्यकर्त्याच्या घरी पाहुणचाराने केली राज ठाकरेंनी पुणे दौऱ्याची सुरवात - अनिकेत ढगे

सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षामध्ये नेहमीच बळ देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवातही कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चहा, नाश्त्याने ( Raj Thackeray Breakfast MNS Activists House ) केली. स्वतः राज ठाकरे घरी आल्याने कार्यकर्ता अनिकेत ढगे ( MNS Activist Aniket Dhage ) यांच्यासह कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Dec 15, 2021, 2:09 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर ( Raj Thackeray Pune Tour ) आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या ( Pune Municipal Corporation Election ) दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. याच पुणे दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी पाहुणचार करून केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवातही कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चहा, नाश्त्याने केली.

नाश्त्याला उपीट आणि पोहे
शिवाजीनगर गावठाण येथील अनिकेत ढगे ( MNS Activist Aniket Dhage ) याच्या घरी राज ठाकरे यांनी आज भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी नाश्त्याला चहा आणि थोडंसं उपीट आणि पोहे खाऊन दौऱ्याची सुरवात केली ( Raj Thackeray Breakfast MNS Activists House ) आहे. ढगे कुटुंबीयांनी सकाळपासूनच घरात विविध पदार्थ करत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. राज ठाकरे घरी येणार असल्याचं समजताच मोठ्या प्रमाणात आनंद झाला होता, अशी भावना यावेळी ढगे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तीन दिवस घेणार विविध पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक
राज ठाकरे हे आजपासून पुण्यात आले आहे. सकाळी 9 ते 11 शिवाजीनगर मतदार संघ आणि त्यानंतर 12 ते 2 कोथरूड मतदार संघ, 4:30 ते 5:50 वाजता खडकवासला मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता हडपसर मतदार संघ अशी बैठक होणार आहे. 16 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 वाजता कसबा मतदार संघ, 12 ते 2 पर्वती मतदार संघ, दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक ते घेणार आहेत. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी- माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे.

हेही वाचा - राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच रूपाली पाटील यांचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.