पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. संभाजी नगरच्या नामांतरावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रात सत्तेत असताना का नामांतर केलं नाही, असा प्र्श्नी त्यांनी विचारला. 'मी म्हणतो' म्हणजे काय याला काय अर्थ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच लवकर संभाजी नगरचे नामांतर लवकरच करा असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका - संभाजी नगरच्या नामांतरावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रात सत्तेत असताना का नामांतर केलं नाही, असा प्र्श्नी त्यांनी विचारला. 'मी म्हणतो' म्हणजे काय याला काय अर्थ आहे, अरे तू आहेस कोण? वल्लभभाई पटेल आहे का महात्मा गांधी आहे? असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी आंदोलनाची केस आहे काय?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे - मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली होती. काहीजण शाल घालून मुन्नाभाईसारखे फिरतात. त्यांना फिरू द्या, त्यांना बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटते. मात्र, त्यांना नंतर कळते की आपल्यात काही केमिकल लोचा झाला आहे, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरे यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला होता. उत्तर द्यायची असतील तर महागाई वर द्या. ही केवळ गर्दी नाही हे सगळे वाघ आहेत. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या, पण भगवा मेंदूत असतो टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का? तुमचे विकृत हिंदुत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी विचार दिला, तुम्ही त्याचा विकार केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा - आताही राजीनामा घेतला नाही.. सध्या पवार बोले शिवसेना चाले अशी स्थिती - भाजप नेते चंद्रकांत पाटील