ETV Bharat / city

Raj Thackeray Pune Speech : अयोध्या दौऱ्याचा विरोध, राज्यातून रचलेला ट्रॅप; राज ठाकरेंची नाव न घेता सर्वच पक्षांवर टीका - Raj Thackeray Latest News In Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी एमआयएम आणि औरंगाबादच्या नामांतरावरूनही महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : May 22, 2022, 1:03 PM IST

Updated : May 22, 2022, 2:15 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी एमआयएम आणि औरंगाबादच्या नामांतरावरूनही महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. सोबतच त्यांनी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि औरंगाबदचे नामांतर संभाजीनगर करावे, अशी मागणीही पंतप्रधान मोदींकडे केली.

अयोध्या दौऱ्यावर स्पष्टीकरण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण सांगितले. पायाचं दुखण सुरू आहे, त्यामुळे कमरेला त्रास होतो. त्याची 1 तारखेला शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच त्यांना अयोध्येत प्रवेश देऊ असे जाहीर केले होते. भाजपच्या खासदाराने त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना दिलेले हे आव्हान म्हणजे मनसेविरोधात रचलेला सापळा होता, असा आरोप राज ठाकरे यांनी आज (22 मे) केला आहे. ते म्हणाले, 'माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे हे सापळा होता. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झाले असते, तर माझ्या कार्यकर्यांवर गुन्हे दाखल झाले असते, कारण माझे कार्यकर्ते शांत बसणारे नव्हते. त्यांना तुरुंगात अडकवले असते. आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे उकरुन काढले गेले असते. म्हणजे, निवडणुकीदरम्यान मनसेचे कार्यकर्तेच गायब झाले असते.' माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, 'मी मुद्दामहून दोन दिवास आधी या दौऱ्याबद्दल सांगितले. कोण काय बोलतं. हे बघायचं होतं. माझ्या दौऱ्याला विरोध हा मुद्दामून सुरू केला गेला. हा एक सापळा आहे. हे माझ्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच तिथे कारसेवा करताना कारसेवकांवर हल्ला झाला होता. त्यात अनेक कारसेवक मारले गेले होते. त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकण्यात आले होते. त्यांचेही दर्शन मला घ्यायचे होते.' एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो, हे शक्य आहे आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल, पण कार्यकर्ते अडकू देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांना माफी मागावी हे आताच कसे आठवले, असा सवालही त्यांनी केला. या प्रकारातून चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचही ते म्हणाले. तसचे यावेळी त्यांनी गुजरातमधील अल्पेश ठाकूर यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, गुजरातमध्ये एक बलात्कार झाला होता. त्यानंतर अल्पेश ठाकूर यांनी गुजरातमध्ये 10 ते 15 हजार उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना गुजरातमधून हाकलून लावले होते. तिथून कोण माफी मागेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकार आताच कसा सुरू झाला हे समजून घ्यायला पाहिजे, मनसे विरोधात सगळे एकत्र होतात. कारण आमचे हिंदुत्व त्यांना झोंबले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Raj Thackeray On Uddhav Thackeray : 'अरे तू आहेस तरी कोण? सरदार पटेल की, महात्मा गांधी' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली होती. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तसेच औरंगाबादच्या नामांतरावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रात सत्तेत असताना का नामांतर केलं नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. 'मी म्हणतो' म्हणजे काय याला काय अर्थ आहे, अरे तू आहेस कोण? असा एकेरी उल्लेख त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केला. राज ठाकरे म्हणाले, अरे तू आहेस कोण? वल्लभभाई पटेल आहे का महात्मा गांधी आहे? असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी आंदोलनाची केस आहे काय?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

'शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो' - शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो. तर अफजलखान हा महाराजांना मारायला आलाच नव्हता, तर राज्याचा विस्तार करायला आला होता, असे पवार म्हणतात. मग काय अफजल खानाच्या राज्यविस्तारामध्ये शिवाजी महाराज आले होते का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांनी काल महाविकास आघाडी सरकार झालेले बघून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य केले होते. त्यांचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'काल शिवसेनेचे कोणीतरी बोलत होते, की महाविकास आघाडीचे सरकार बघून बाळासाहेबांना आनंद झाला असता.' तसेच शरद पवार यांनी म्हटले होते, की आम्ही ( बाळासाहेब ठाकरे आणि पवार) मंचावरुन एकमेकांना काहीही बोललो तरी संध्याकाळी एकत्र जेवण करत असू. शरद पवार असे बोलतात आणि शिवसेना काहीच म्हणत नाही, यामुळे शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहे, शिवसेनेला एवढीही अक्कल नाही, असे ते म्हणाले.

दृष्टीहीन मुलांना बसवले मंचावर - पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी आलेल्या दृष्टीहीन मुलांना राज यांनी थेट मंचावर बसवले. आम्ही जिथे जिथे राज ठाकरे यांची सभा होत असते तिथे तिथे जात असतो. कोणीही आज पर्यंत आम्हाला एवढे मान सन्मान दिले नाही, ते राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे यांचा आक्रमकपणा तर बघितला होता, आजचा त्यांचा प्रेमळपणा बघून खूप आनंद वाटत आहे, असे यावेळी दृष्टीहीन मुलांनी सांगितले.

हेही वाचा - Raj Thackeray On Ayodhya Visit : 'माझ्या अयोध्या दौऱ्याचा विरोध हा एक सापळा होता, माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही'

Last Updated : May 22, 2022, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.