पुणे - मागील दोन महिन्यात झालेल्या नाट्यमय घडामोडी सर्व महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. राज्यात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार फार काळ टिकणार नसल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
हेही वाचा - अंतिम आठवडा प्रस्तावाला मंत्र्यांची दांडी, प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबईत २३ जानेवारीला पहिले मनसेचे अधिवेशन होणार आहे. राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार हे नवीन समीकरण असून त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. याचाच परिणाम येणाऱया निवडणुकांमध्ये होणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. भाजप सेनेने मतदारांची प्रतारणा केली आहे. निवडणुकींसाठी ज्यांनी पक्षांत्तर केले, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला याचा आनंद जास्त आहे. अशा लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.