पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. पायाचं दुखण सुरू आहे, त्यामुळे कमरेला त्रास होतो. त्याची 1 तारखेला शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे हे सापळा होता. असा आरोपही त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे - मी मुद्दामून दोन दिवास आधी या दौऱ्याबद्दल सांगितलं. कोण काय बोलतं. हे बघायचं होते. हा विषय मुद्दामून सुरू केला आहे. हा एक सापळा आहे. हे माझ्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच कारसेवकांना मारल्यानंतर शरयू नदी मृतदेह टाकण्यात आले होते. त्याचे दर्शन मला घ्यायचे होते. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झालं असतं, तर माझ्या कार्यकर्यांवर गुन्हे दाखल झाले असते. माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही. तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या. एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो हे शक्य आहेत आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल पण कार्यकर्ते अडकू देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांना माफी मागावी हे आताच कशी आठवली. या प्रकारातून चुकीचे पायंडे पाडल्या जात असल्याचही ते म्हणाले. तसचे यावेळी त्यांनी अल्पेश ठाकूर यांनी गुजरातमध्ये 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलण्यात आले तिथून कोण माफी मागेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकार आताच कसा सुरू झाला हे समजून घ्यायला पाहिजे, मनसे विरोधात सगळे एकत्र होतात. कारण आमचे हिंदुत्वा त्यांना झोमले, असेही ते म्हणाले.
अयोध्या दौरा दुर्तास रद्द - राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवरील पाडवा मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानूसार येत्या 5 पाच जून रोजी ते अयोध्येला जाणार होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी ट्विट करत अयोध्यो दौरा तुर्तास स्थगित करत असल्याचे सांगितले होते.
ब्रिजभूषण सिंह यांचा होता विरोध - राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना माफी मागा अन्यथा अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. 'आम्ही उत्तर भारतीय आहोत आणि हा प्रश्न उत्तर भारतीयांचा आहे, हिंदू, मुस्लिम, दलित, मजूर, ब्राह्मण, ठाकूर या सर्वांचा यात समावेश आहे. हा माझा आजचा मुद्दा नाही. 2008 पासून, मी श्री जी यांना कुठेतरी भेटण्यासाठी शोधत होतो, पण ते सापडले नाहीत, कारण ते दर्बा येथे राहतात. मुंबईत लोक मारहाण करतात, पण मुंबईतून बाहेर पडत नाहीत. पहिल्यांदाच मुंबई सोडतोय, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा - VIDEO : पुण्यात आज राज 'गर्जना', कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त