पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 तारखेला औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार ( Raj Thackeray Rally In Aurangabad ) आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. औरंगाबाद येथील जाहीर सभेच्या आधी राज ठाकरे 29 आणि 30 तारखेला पुण्यात येण्याची शक्यता ( Raj Thackeray Pune Tour on 29 to 30 April ) आहे. पुणे येथूनच ते औरंगाबाद येथे जाणार आहेत. यात 100 ते 150 गाड्यांचा ताफा हा ठाकरे यांच्याबरोबर औरंगाबाद येथे जाणार आहे. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.
औरंगाबादेतील सभेची जय्यत तयारी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. मात्र असे असताना ही मनसेच्यावतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच 3 तारखेला अक्षय तृतीय निमित्ताने शहरात विविध मंदिरात आरती देखील केली जाणार आहे, असे देखील यावेळी वागस्कर म्हणाले.
12 रेल्वेची मागणी - राज ठाकरे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 रेल्वे देण्याची मागणी मनसैनिकांनी केली आहे. तर जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिक हे आयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती देखील यावेळी वागस्कर यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी