पुणे - जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाच्या अहवालात धक्कादायक महिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण १६६० बालके कुपोषित असल्याचे या अहवालात निष्पन्न झाले आहे. यावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतने ( Pune ZP CEO Ayush Prasad interview ) घेतली आहे.
सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला बाकल्याण विभागातर्फे लहान मुलांची तपासणी करण्यात येत आहे. विभागाने आजपर्यंत २ लाख १२ हजार ३१८ बालकांची तपासणी केली आहे. त्यात एकूण १६६० बालके कुपोषित असल्याची ( 1660 malnourished children in Pune district ) माहिती आली आहे. त्यामधील १२८९ मुले हे मध्यम कुपोषित, तर ३७१ मुले हे अतिकुपोषित असल्याचे अहलात म्हटले आहे.
हेही वाचा-Mini Lockdown In Mumbai? : मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापेक्षा मिनी लॉकडाऊन बरा - किशोरी पेडणेकर
कोरोनामुळे महिलांच्या व बालकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील गर्भवती महिला, बालके या साऱ्यांचे आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने एक पथक तयार करून या तपासणीची सुरूवात केली होती.
जिल्ह्यात आणखीन ९० हजार बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. कुपोषण निर्मुलनासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा हा कुपोषणमुक्त केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ईटीव्ही भारतला ( Pune ZP CEO on malnourished children ) दिली आहे.
२०२१ वर्षात सुमारे १ कोटी बालके कुपोषणाच्या खाईत लोटले जातील- युनिसेफ
कोरोना महामारीमुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेपुढे संकट उभे राहिल्याचे आपण २०२० वर्षात पाहिले. मात्र, हे संकट अजूनही संपले नसून येत्या वर्षातही त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळणार आहेत. लहान बालके या संकटात सर्वात जास्त भरडली गेली आहेत. नववर्षात युनिसेफने कुपोषणाचा प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२१ वर्षात सुमारे १ कोटी बालके कुपोषणाच्या खाईत लोटले जातील असे, युनिसेफने म्हटले आहे. नायजेरीया, दक्षिण सुदान, येमेनसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे म्हटले आहे.
उपासमारीचे स्थितीचे परिणाम गंभीर -
आपल्या मुलाबाळांना गंभीर परिस्थितीत काय खायला घालावे, असा प्रश्न कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबीयांपुढे असताना उपासमारीची स्थिती निर्माण झाली आहे. तीव्र कुपोषण हा अपुऱ्या पोषणाचा सर्वांत गंभीर प्रकार असून त्याचे परिणाम उघडपणे दिसतात. पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. कुपोषीत मुलांचे वजन खुप कमी असते. अशा बालकांचा विकास खुटतो.