पुणे - प्रत्येक वर्षी वातावरणाचे ऋतू हे बदलत असतात. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हा ठरलेलाच. उन्हाची दाहकता वाढते आणि या रखरखत्या उन्हात प्रत्येक माणसाची पावले आपोआप शीतपेयाकडे वळतात. उन्हाची दाहकता जशीजशी जाणवते तसातसा कानावर घुंगराचा आवाज करत रसवंतीचा तो नाद निनादतो. आणि आपोआपच आपली पावलं ओळतात तर असं तिकडेआणि गोड उसाचा रस पिऊन मन कसे तृप्त होते. पण त्या रसवंतीकडे जाताना नेहमीच आपल्या मनात एक प्रश्न उद्भवत असेल की जाहीर रसवंतीमध्ये आपण रसाचा आनंद घ्यायला जातो त्या सगळ्या रसवंती चे नावं कानिफनाथ आणि नवनाथ अशीच का असतात. असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो त्यासोबतच आणखीन एक प्रश्न फार पूर्वी पासून आपल्या मनात घर करून आहे की महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही एस. टी. स्टॅंडवर गेल्यावर तिथं या नावाची एक रसवंतीगृह असतेच. पण हे काही असेच घडले नाहीये, किंवा हे सगळ अचानक झाले असे देखील नाही. या साऱ्या गोष्टीला खूप जुना आणि मोठा इतिहास आहे. काय आहे तो नेमका इतिहास, महाराष्ट्रातील रसवंतीगृहाला कानिफनाथ आणि नवनाथ ही दोन नावच का? या सगळ्यांचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत ईटीवी भारतच्या या स्पेशल रिपोर्टमधून.
काय आहे रसवंती गृहांच्या नावाच्या मागचा इतिहास - रसवंतीगृहांना नवनाथ किंवा कानिफनाथ ही दोन्ही नावे असण्यामागे एक धार्मिक कथा आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांचा जन्म हा हत्तीच्या कानापासून झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हत्तीचे आवडते खाद्य म्हणजे ऊस. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीपासून झाल्याने त्यांना सुद्धा ऊस आवडत अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ऊसाचा व्यवसाय करायचा असल्याने श्रद्धेच्या भावनेने अनेक जण रसवंती गृहला नवनाथ किंवा कानिफनाथ असे नाव देतात. आणि हे सगळं पारंपारिक रित्या गेल्या अनेक वर्षापासून असंच सुरू आहे. पण हे सारे इथेच संपत नाही. उसाच्या रसाचा व्यवसाय करणारे बरेचसे लोक पुणे जिल्ह्यातील एका गावातून येतात हे देखील आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये.
अख्ख्या महाराष्ट्राला रसवंतीगृह देणार बोपगाव - पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील बोपगाव नजिक च्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपेकी एक कानिफनाथ महाराज ध्यानाला बसले होते. तिथे सध्या मंदिर देखील आहे. इतकंच काय तर तिथं राहणारे नागरिक स्वाभाविकपणे महाराजांचे भक्त आहेत. त्यामुळे तिथे व्यवसाय करणाऱ्या भक्तांनी रसवंतीगृहाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ ठेवले आणि ती प्रथा आजही अशीच भावनेने जपली जाते आहे. इथल्या गावकऱ्यांचे हे मंदिर म्हणजे कुलदैवत. आज देखील येथे राहणारी लोक नवनाथांची तितक्याच आस्थेने पूजा करतात. आणि ही परंपरा अशीच चालू राहणार असल्याचे देखील तिथले गावकरी सांगतात.
हेही वाचा - Praveen Darekar Aggressive In LC : दरेकर भडकले! उपसभापतींवर केला पक्षपातीपणाचा आरोप