पुणे - राज्यात कोरोनाचा (Corona Cases) धोका दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण आधीच्या लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) तीनपटीने वाढताना दिसत आहे. त्यातच राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन लागणार का (Lockdown in Pune) असा प्रश्न पडला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पुण्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण (Pune traders) निर्माण झाले आहे. लॉकडाऊन नको, कडक निर्बंध करा अशी भूमिका या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील तुळशीबागेतील व्यापाऱ्यांची मतं जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...
- आता लॉकडाऊन केला तर मरून जाऊ -
राज्यासह पुणे शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबागेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या बाजारपेठेत मोठ्या संख्येने छोटे मोठे व्यापारी हे आपला व्यापार करत असतात. वाढती रुग्णसंख्या पाहता जर शासनाने विकेंड लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन लावला तर आम्ही मरुन जाऊ, अशी भूमिका यावेळी या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आम्हा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशातच आता पून्हा लॉकडाऊन लावला तर आम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे आणि त्यातून बाहेर पडणे शक्य नाही, असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
- शहरात 7 हजारहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण
शहरात कोरोनाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात एकूण 6 हजारहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून, ही संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यासह शहरात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.