पुणे - अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या कालीचरण बाबाला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबाला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील जाहीर कार्यक्रमात कालीचरण बाबाने दोन समाजात तेढ निर्माण करणारे ( Kalicharan Maharaj Controversial statement ) वक्तव्य केले होते. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी कालीचरणला छत्तीसगडमधील रायपूर येथून मंगळवारी ताब्यात ( Khadak Police arrest Kalicharan from Pune ) घेतले. त्याला पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केले.
खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुण्यात समस्त हिंदु आघाडीच्या वतीने शिवप्रतापदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात कालीचरण महाराजाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा-Kalicharan Maharaj Custody Of Pune Police : कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
कालीचरण याच्यासह समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, अकोल्याचे कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-Case against Kalicharan Maharaj: गांधी-नेहरुंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरणवर अखेर 15 दिवसांनी गुन्हा दाखल
आज न्यायालयात केले हजर
कालीचरण महाराजाला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याचे शिष्य अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आम्ही आमच्या महाराजांच्या विधानाचे समर्थन करतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मिलिंद एकबोटे यांच्यावरही आहे गुन्हा दाखल
दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. कालीचरण महाराजासोबतच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कालीचरण महाराजने काय वादग्रस्त वक्तव्य केले ?
कालीचरण महाराजने मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी बोलताना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. याच व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचे अभिनंदन केले आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये धर्मसंसद पार पडली होती. याच धर्मसंसदेत कालीचरण महाराजाने हे तारे तोडले होते.