पुणे : अनेक दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत आलेल्या प्रसिद्ध कालीचरण महाराजांना ( Kalicharan Maharaj Controversial Statement ) पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेतलं ( Pune Police Arrested Kalicharan ) होत. काल कोर्टात हजर केल्यानंतर कालीचरण महाराजांना परवा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर कालीचरण महाराजांना काल पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होत. त्यात महाराजांना अगोदर ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर लगेचच वकिलांनी जामीनासाठी अर्ज न्यायालयाकडे केला होता. त्यानुसार आज कालीचरण महाराजांना पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला ( Kalicharan Maharaj Got Bail ) आहे.
पुण्यात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काल छत्तीसगडमधील रायपूर येथून काल ताब्यात घेतलं होतं. आज पुणे पोलिसांनी पुणे सेशन कोर्टात ( Pune Session Court ) हजर केलं होतं.
खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
पुण्यात समस्त हिंदू आघाडीच्यावतीने शिवप्रतापदिनी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं वकतव्य केलं होत. त्यानंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारण्यात आला ( Kalicharan Maharaj Pune Case ) होता. कालीचरण यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्र कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम २९५ (अ), २९८, ५०५ (२), ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.