ETV Bharat / city

फिल्मी स्टाइलने 1 कोटी लुबाडणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक - stole Rs 1 crore

रामदास भाऊसाहेब भोसले (वय 30), तुषार बबन तांबे (वय 22) आणि भरत शहाजी बांगर (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र बाळासो जाधव (रा. वाघोशी, फलटण) त्यांनी तक्रार दिली.

पुणे ग्रामीण पोलीस
पुणे ग्रामीण पोलीस
author img

By

Published : Aug 6, 2021, 4:08 PM IST

Updated : Aug 6, 2021, 6:49 PM IST

पुणे - जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटस गावाजवळ 3 ऑगस्टच्या रात्री एसटी बसला दुचाकी आडवी लागून पोलीस असल्याची बतावणी करून एसटीतील चार प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी यातील तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 92 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामदास भाऊसाहेब भोसले (वय 30), तुषार बबन तांबे (वय 22) आणि भरत शहाजी बांगर (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र बाळासो जाधव (रा. वाघोशी, फलटण) त्यांनी तक्रार दिली. यवत पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

एसटी बस थांबविण्यास भाग पाडले

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की फिर्यादी एका कुरियर कंपनीत काम करतात. 2 ऑगस्टच्या मध्यरात्री ते आणखी तीन साथीदारांसह लातूर ते मुंबई या एसटी बसमधून कुरिअर कंपनीची जमा झालेली रक्कम घेऊन सोलापूर-पुणे महामार्गाने प्रवास करीत होते. यावेळी वरील आरोपींनी पाटस गावाजवळ दुचाकी आडवी लावून एसटी बस थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर एसटीत प्रवेश करून फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना आपण पोलीस असल्याचे सांगत गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर या सर्वांना दमदाटी आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 1 लाख 12 हजार 36 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

सापळा रचून अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा शिरूर तालुक्यातील वरुडे गावातील गणेश भोसले आणि त्याचा भाऊ रामदास भोसले यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला असता ते खराडी बायपास येथे असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून शिरूर तालुक्यातील वरुडे गावातील उसाच्या शेतात लपून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अधिक तपास सुरू

या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का, आरोपींना गाडीत पैसे असल्याची माहिती कोणी दिली, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, त्यांच्या या कटात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव गुप्ता यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

Last Updated : Aug 6, 2021, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.