ETV Bharat / city

'मॅडम, मला तुमचा नंबर हवाय'...पुणे पोलिसांचे भन्नाट ट्वीट व्हायरल! - pune police twitter reply

सध्या सोशल मीडियावर पोलीस चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ट्वीटर, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांतून नेटीझन्सला रिप्लाय देताना अनेक भन्नाट गोष्टी पुढे येत असतात. यामध्ये मुंबई पोलीस कायमच अग्रेसर आहेत.

pune police tweet
सध्या सोशल मीडियावर पोलीस चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
author img

By

Published : Jan 14, 2020, 11:02 AM IST

Updated : Jan 14, 2020, 12:21 PM IST

पुणे - सध्या सोशल मीडियावर पोलीस चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ट्वीटर, फेसबूक यांसारख्या समाज माध्यमांतून नेटीझन्सला रिप्लाय देताना अनेक भन्नाट गोष्टी पुढे येत असतात. यामध्ये मुंबई पोलीस कायमच अग्रेसर आहेत.

परंतु, आता पुणे पोलिसांनी एका महिलेचा नंबर विचारणाऱ्या रोमियोचा चांगलाच समाचार घेतलाय. ट्वीटरवरील या भन्नाट रिप्लायमुळे पुणे पोलीस नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.

काय आहे किस्सा ?

पुणे पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवर एका महिलेने धानोरी पोलीस ठाण्याचा क्रमांक विचारला. याला पोलिसांनी तत्काळ प्रत्युत्तर ट्वीट केले. संबंधित महिलेच्या ट्वीटवर एका रोमियोने पुणे पोलिसांना टॅग करून 'मला तुमचा (महिलेचा) नंबर मिळेल का' असे विचारले.

  • Sir, we are more interested in your number currently, to understand your interest in the lady’s number. You may DM. We respect privacy. https://t.co/LgaD1ZI2IT

    — PUNE POLICE (@PuneCityPolice) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर पुणे पोलिसांनी ट्वीट करून 'आता आम्हाला तुमचा नंबर जाणून घेण्यात रस आहे', असे ट्वीट केले. तसेच 'आम्ही प्रायव्हसी जपतो' असे सांगून या रोमियोला पर्सनल मेसेज करायला सांगितले. पुणे पोलिसांच्या या ट्वीटमुळे पोलिसांचे सोशल मीडिया अकाऊंट चांगलेच चर्चेचा विषय ठरला आहे. सर्व स्तरांतून पोलिसांच्या ट्वीट बद्दल भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 14, 2020, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.