पुणे गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सवावर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वत्र सण उत्सव हे उत्साहात साजरा होत आहे. उद्या सर्वत्र दहीहंडी ही Dahi Handi festival जल्लोषात साजरा होणार आहे. मात्र, हा जल्लोष रात्री दहा वाजेपर्यंतच करता येणार असून, गोविंदांना रात्री दहाच्या आतच हंडी फोडावी लागणार आहे. पुणे पोलिसांकडून तशी नियमावली जाहीर Rules announced by Pune police करण्यात आली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात निर्धारीत केलेल्या नियमांनुसार रात्री दहाच्या आत मंडळांना आपली दहीहंडी फोडावी लागणार आहे. पोलिसांकडून मध्यभागातील मंडई परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवाजाच्या बाबातीत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. दहीहंडीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे.
तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकांची नेमणूक विशेष म्हणजे पोलिसांनी यंदा तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच महिला छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पथके तैनात ठेवली आहेत.
हेही वाचा Dahi Handi 75 शहिदांच्या पत्नीचा साडी चोळी देऊन करणार सन्मान सुवर्णयोग तरुण मंडळ