पुणे - आरोग्य विभागाचे (Maharashtra Health Department) पेपर फोडणाऱ्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी (Pune Police Cyber Cell ) आज रविवारी होणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Exam) परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या (Mhada Exams Paper Leak) तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Mhada Exams Paper Leak : म्हाडाचे पेपर फोडणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांकडून अटक - म्हाडा भरती पेपर फुटी
पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Exam) परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या (Mhada Exams Paper Leak) तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
म्हाडा पेपर
पुणे - आरोग्य विभागाचे (Maharashtra Health Department) पेपर फोडणाऱ्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी (Pune Police Cyber Cell ) आज रविवारी होणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Exam) परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या (Mhada Exams Paper Leak) तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
तिघांना सायबर पोलिसांकडून अटक -
प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुखने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.