ETV Bharat / city

Pune Police : पुणे पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, चौघे अटकेत

गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Crime Branch Pune ) एकूण तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे 11 पिस्तूल जप्त ( pistols ) करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या ( Pune Police ) गुन्हे शाखेच्या 6 पथकाने ही कारवाई केल

पुणे पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, चौघे अटकेत

author img

By

Published : Apr 25, 2022, 10:55 PM IST

पुणे - गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Crime Branch Pune ) एकूण तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे 11 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या ( Pune Police ) गुन्हे शाखेच्या 6 पथकाने ही कारवाई केली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय 21 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यासोबतच निखिल उर्फ सनी बाळासाहेब पवार ( वय 23 वर्षे), युवराज बापू गुंड ( वय 24 वर्षे) आणि अमोल नवनाथ तांबे ( वय 27 वर्षे ), अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण..? - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्वर डुकरे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपींची नावे सांगितली. त्यांच्या ताब्यातून पिस्तूल जप्त ( pistols ) करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा पिस्तूल जप्त केले आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - President Rule In Maharashtra : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का?, काय आहे त्याचे निकष; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.