पुणे - प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा पुणे-सोलापूर रस्त्यावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. यावेळी गाडीत एकूण तीनजण असल्याची माहीती मिळाली आहे. या अपघातातून आनंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत.
सोलापूरच्या दिशेने जात असताना शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आनंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला थोडीफार दुखापत झाली आहे. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.