ETV Bharat / city

MPSC Student Agitation : पुण्यात 'एमपीएसी'च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा कडक बंदोबस्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 ला आपला नवा अभ्यासक्रम लागू करणार आहे. मात्र, तो अभ्यासक्रम 2025 पासून करावा यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पण, पोलिसांनी त्यांना रोखले ( mpsc students agitation against new syllabus in pune ) आहे.

MPSC Student Agitation
MPSC Student Agitation
author img

By

Published : Jul 25, 2022, 5:29 PM IST

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुण्यात शास्त्री मार्ग येथे मोठ्या संख्येने एमपीएससी विद्यार्थी वस्तीगृहात, अथवा भाड्याने खोली करून राहतात. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम बदलाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांना रोखले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलिसांना हाताशी धरुन गळचेपी करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला ( mpsc students agitation against new syllabus in pune ) आहे.

...म्हणून विद्यार्थ्यांनी घेतला आंदोलनचा पवित्रा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात आता ऐवजी 2025 लागू करावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली होती. त्याबाबतचे पत्र तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत अवगत केले होते. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, जमण्याचे ठिकाण येथे कडक पहारा ठेवल्याने मनात दहशत निर्माण केली. परिणामी आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

याबाबत नितीन देशमुख ( विद्यार्थ्याचे नाव बदलले आहे ) याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, 'एमपीएससीने 2012 पासून एम.सी.क्यू मल्टिपल चॉइस क्वेश्चन या पद्धतीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा सुरू केली. त्यापूर्वी सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती विस्तारित उत्तरे लिहा या स्वरूपाची होती. मात्र, आता मल्टिपल चॉइस क्वेश्चन ही पद्धत रद्द करून पुन्हा वर्णनात्मक रितीने उत्तरे लिहावी ही पद्धत आणलेली आहे. या नवीन पद्धतीमुळे गेल्या दहा वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी आधीच्या म्हणजे मल्टिपल चॉइस क्वेश्चन या पद्धतीचा सराव केला असल्याने नवीन पद्धतीने प्रश्नांची उत्तरे सोडवणे हे जिकरीचे जाणार असल्याचं म्हटलं आहे.'

तर, जनार्दन तडवी (नाव बदलले आहे) याने म्हटलं की, 2025 पासून नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत लागू करावी. एमपीएससीने या अभ्यासक्रमाला जे विरोध करतील किंवा प्रतिकूल काही बोलतील त्यांना काळ्या यादीत टाकू, अशी धमकी दिली आहे. परिणामी आम्ही पुण्यातील एमपीएससी मुख्यालय जवळ जमण्याच्या आधीच पोलिसांना कळवले गेले. पोलिसांच्या सुरक्षेमुळे एखाद्या छावणीसारखे स्वरूप त्या भागात तयार झाले आहे. हे कृत्य विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करण्याचे आहे, असा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे.

याप्रकरणी एमपीएससीचे उपसचिव सुनील आवटे यांच्याशी 'ईटिव्ही भारत'ने संपर्क केला. ते म्हणाले, अभ्यासक्रम बदलाबाबत नियम आमच्या संकेतस्थळ येथे नमूद केले आहे. तसेच, विद्यार्थी पोलीस परवानगी न घेता आंदोलन करतील, तर पोलीस कायद्यानुसार आपले काम करतील, असे आवटेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणी विद्यार्थी ठाम आहे. तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग देखील ठाम आहे, येत्या 2023 शैक्षणिक वर्षा पासून नवीन अभ्यासक्रम योजना लागू करतील. यात विद्यार्थ्यांची भावना समजून घेऊन सामंजस्याने तोडगा काढता येऊ शकतो. मात्र, प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा - Katrina Kaif Threat Case : कतरिना आणि विक्कीला धमकी देणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.