पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांनी गुढीपाडव्याला दादर येथील शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पुण्यातील काही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्या नाराज कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेटीगाठी सुरु असल्याचे आज ( बुधवार ) पुणे मनसेमध्ये पहायला मिळाले आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेच्या शाखाप्रमुखाने राजीनामा दिला ( MNS Activist Left Party ) होता. या राजीनामा दिलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट शहराध्यक्ष वसंत मोरे ( MNS Leader Vasant More ) यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी भाषणात भोंग्याबाबत ( Raj Thackeray Ajan Statement ) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाराज झालेल्या मनसेच्या मुस्लीम शाखाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर वसंत मोरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
"एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण, जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून सांगायला पाहिजे," असे वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.

पुण्यात राजीनामासत्र - राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर शाखाध्यक्ष माजिद शेख आणि शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. शेहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. मशिदीवरील भोंगे आणि मदरशाबाबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याचे कळतयं.
हेही वाचा - Ajit Pawar Reply Raj Thackeray : 'अचानक बाहेर निघायचं अन् भोंगे बंदची भाषा करायची, आतापर्यंत झोपले होते का?'