ETV Bharat / city

कौतुकास्पद..! पुणे महापालिकेने बिल ऑडिट करून रुग्णांना मिळवून दिले सव्वा तीन कोटी रुपये

कोरोना रुग्णांना खासगी दवाखान्यात दाखल केल्यास पीपीई किट, ग्लोज, मास्क यापासून सर्वच गोष्टींचे पैसे रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी वाढीव पैसे घेतल्याने नागरिकांची मानसिक तसेच आर्थिक कोंडी होत होती. रुग्णालयांनी जादा पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये पालिकेचे ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून तब्बल १२०० लोकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आणि दीड लाखांवरील सर्व बिले तपासून रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा दिला आहे.

author img

By

Published : May 11, 2021, 12:26 PM IST

पुणे महापालिका,बिल ऑडीटिंग
पुणे महापालिका

पुणे - कोरोना रुग्णांवरील उपचाराचे अव्वाच्या सव्वा बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच चाप लावला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात बिल येत होते. त्यांच्या या बिलाचे ऑडिट होत नव्हते. त्यामुळे महापालिकेने या रुग्णालयांचे ऑडिट करून गेल्या नऊ महिन्यांतील सुमारे आठशे रुग्णांना सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.

सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले -

कोरोना रुग्णांना महापालिकेच्या दवाखान्यात दाखल केल्यास खर्च येत नाही. मात्र खासगी दवाखान्यात दाखल केल्यास पीपीई किट, ग्लोज, मास्क यापासून सर्वच गोष्टींचे पैसे रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी वाढीव पैसे घेतल्याने नागरिकांची मानसिक तसेच आर्थिक कोंडी होत होती. रुग्णालयांनी जादा पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये पालिकेचे ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून तब्बल १२०० लोकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आणि दीड लाखावरील सर्व बिले तपासून रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा दिला आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली..

आत्तापर्यंत 1 हजार 149 लोकांनी केली तक्रार दाखल-

महापालिकेच्या माध्यमातून जी यंत्रणा नेमण्यात आली त्या यंत्रणेत १ हजार १४९ लोकांनी तक्रारी दाखल केल्या असून ८०२ तक्रारींमध्ये खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. ऑडिट केल्यावर ३ कोटी २७ लाख ८७ हजार ७३३ रुपये बिल कमी झाले असून ती बिले संबंधित रुग्णांना परत करण्यात आले आहे. आपल्यालाही जादा बिलाचा अनुभव आला असल्यास ०२०-२५५०२११५ या क्रमांकावर संपर्क करा किंवा billscomplaint@gmail.com वर संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.