ETV Bharat / city

Shivsena Vs NCP : जुन्नरच्या आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमात ग्रामस्थांसमोरच हमरीतुमरी, पाहा व्हिडिओ - माजी आमदार शरद सोनवणे

राज्यात असलेल्या महाविकास आघाडीत सार काही आलबेल असल्याचे तिन्ही पक्षातील नेते सातत्याने सांगत असतात. मात्र अनकेदा स्थानिक पातळीवर आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय आज जुन्नरमध्ये पाहायला मिळाला.जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या श्रेयवादातून हा वाद झाला आहे.

mla fights in open event in Junnar
mla fights in open event in Junnar
author img

By

Published : Jan 5, 2022, 10:24 PM IST

Updated : Jan 5, 2022, 10:37 PM IST

पुणे - राज्यात असलेल्या महाविकास आघाडीत सार काही आलबेल असल्याचे तिन्ही पक्षातील नेते सातत्याने सांगत असतात. मात्र अनकेदा स्थानिक पातळीवर आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय आज जुन्नरमध्ये पाहायला मिळाला.

जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमात हमरीतुमरी
नेमकं काय घडले ?
राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेतील कामाच्या श्रेयावरून हा वाद झालेला पाहायला मिळाला. त्याचे झाले असं की, जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावातील रस्त्याचे मंगळवारी उद्घाटन होते. याच कार्यक्रमाला विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शिवसेनेच्या नेत्यांना डावललं. मात्र माजी आमदार सोनवणे यांनी आमदार बेनके यांच्या आधीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
असा घडला वाद -
काही वेळाने या कार्यक्रमाला अतुल बेनके देखील आले आणि आजी-माजी आमदार शेजारीच बसले. यांनतर सोनवणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण न दिल्याचा प्रश्न उस्थित करत विद्यमान आमदारांना प्रश्न विचारला. हा प्रश विचारताना माजी आमदार सोनवणे यांनी बेनके यांच्या हाताला स्पर्श केला. यावरूनच वादाची ठिणगी पडली आणि मला हात लावायचा नाही, असे बेनके यांनी सोनवणे यांना ठणकावले. त्यांनी हात न लावता फक्त चर्चा करा असे सांगितले या भरत सोनवणे यांनी प्रत्युत्तर देताना तुम्ही चर्चा करा, असं तर म्हणता मग हाताचा मुद्दा काय घेवून बसला आहात असा सवाल अतुल बेनके यांना केला.या साऱ्या कारणावरून आजी माजी आमदार एकमेकांसमोर उभे राहिले आणि उपस्थित असलेले सारेजण अवाक् झाले. नंतर मग ग्रामस्थांनीच मध्यस्थी करत आजी-माजी आमदार यांच्यातला वाद मिटवला.

Last Updated : Jan 5, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.