ETV Bharat / city

Grampanchayat Election 2022 : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पारडे जड; सहा ग्रामपंचायती बिनविरोध - Pune Grampanchayat Election

पुणे जिल्ह्यात आज ६१ ग्रामपंचायतींचे निवडणुका पार पडल्या. या ६१ ग्रामपंचायती पैकी ५५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.  या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारल्याचे पहायाल मिळाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ( Nationalist Congress Party ) पारडे जड असल्याचे पहायला मिळाले आहे. ( Maharashtra Politics )

Grampanchayat Election 2022
पुणे ग्रामपंचायत निवडणुक
author img

By

Published : Sep 19, 2022, 5:04 PM IST

पुणे : पुणे जिल्ह्यात आज ६१ ग्रामपंचायतींचे निवडणुका पार पडल्या. या ६१ ग्रामपंचायती पैकी ५५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारल्याचे पहायाल मिळाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे पहायला मिळाले आहे. ( Maharashtra Politics )

काँग्रेसचा सुपडा साफ : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाला या ग्रामपंचायत निवडणुकीत किती जागांवर बाजी मारता येईल याची चर्चा होती. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Former Member of Parliament Shivajirao Adharao Patil ), माजी मंत्री शिवतारे हे शिंदे गटात गेल्याने ग्रामपंचायत लढतीत शिंदे गट बाजी मारेल की काय, अशी चर्चा जिल्ह्यात असताना जिल्ह्यात शिंदे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे पहायला मिळत आहे.

पुणे ग्रामपंचायत निवडणुक

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व : ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या आंबेगाव तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला असून 14 ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे, तर भाजप आणि शिंदे गटासह शिवसेनेला हि आंबेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शिंदे गटाला केवळ 3 ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे, तर भाजपला केवळ 1 ग्रामपंचायतवर यश मिळवता आले असून शिवसेनेला आणि कॉंग्रेसला आंबेगाव तालुक्यात खाते ही उघडता न आल्याने शिवसेनेला आणि कॉग्रेस ला ग्रामपंचायत निवडणूकीत जोरदार धक्का बसला आहे.

भाजप शिंदे गट आणि शिवसेनेला बसला मोठा धक्का : जुन्नर तालुक्यातील 33 ग्रामपंचायत निवडणूकांचा आज निकाल जाहीर झाला असून, या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले असून, बेनके यांच्या गटाने 15 ग्रामपंचायती वर विजयी मिळवलाय, तर भाजप शिंदे गट आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेला 02 तर भाजपला 02 ग्रामपंचायतीवर यश मिळाले असून स्थानिक आघाडीला 11 ठिकाणी यश मिळाले आहे तर अपक्षांना 03 ठिकाणी यश मिळाले असून ठिकाणी कॉग्रेस ला खाते हि उघडता आले नाही. एकूणच जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचेच वर्चस्व पहायला मिळत आहे.

एकुण 61 पैकी 6 बिनविरोध

एकुण 55 ग्रामपंचायत मतमोजणी निकाल

शिवसेना - 03

शिंदे गट - 03

भाजपा - 03

राष्ट्रवादी काँग्रेस - 30

अपक्ष - 16

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.