ETV Bharat / city

Pune Crime News : पुण्यात गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची केली तोडफोड

पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी येरवडा परिसरातील वाहनांची तोडफोड केली ( Vehicle Vandalism At Yerawada ) आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नसल्याचे अधोरेखित होत आहे.

Vehicle Vandalism At Yerawada
Vehicle Vandalism At Yerawada
author img

By

Published : Mar 11, 2022, 12:28 PM IST

Updated : Mar 11, 2022, 2:31 PM IST

पुणे - पुण्यात दहशत माजवण्यसाठी गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी वाहनांची तोडफोड केली ( Vehicle Vandalism At Yerawada ) आहे. सात दुचाकी, रिक्षा आणि एका कारचे या तोडफोडीत नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.

vehicle vandalism at yerawada
रिक्षांची करण्यात आलेली तोडफोड

शहारातील येरवडा येथील गाडगीळ येथे काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हेगार तरुणांचा शोध घेत आहेत.

स्थानिक नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करताना

यापूर्वीही घडल्या घटना

मागील काही दिवसांपासून सातत्याने येरवड्यात अशा घटना घडल्या आहेत. ज्यांनी हे नुकसान केले आहे. त्यांच्यावर कारवाई करत, आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळायला हवी. अन्यथा आम्ही सर्व रिक्षाचालक रस्त्यावर उतरु, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत

Last Updated : Mar 11, 2022, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.