पुणे: अंधेरी विधानसभा निवडणुकीत ( Andheri Assembly Elections ) भारतीय जनता पार्टीने ( Bharatiya Janata Party ) माघार घेतली. ते थोडा उशीर झाला, परंतु देर आहे दुरुस्त आहे. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी भारतीय जनता पार्टी वरती टीका ( MP Supriya Sule criticizes BJP ) केली आहे. महाराष्ट्राची जी राजकीय परंपरा आहे ती गेल्या अनेक दिवसापासून खराब झाल्यासारखे वाटत होती. त्यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करावी असा हा सगळा प्रसंग आहे .
चंद्रकांत दादा पाटलाच्या बैठकीला सुप्रिया सुळे - पवार साहेबांनी पत्र लिहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीनेही माघार घेतली त्याबद्दल त्यांचे आभार. परंतु आम्ही सर्वांनीच कुठेतरी राजकारणाच्या मर्यादा, राजकारणाच्या वर्तणूक सुधारावी लागेल. त्यासाठी मी माझ्यापासूनच सुरुवात करते असेही त्यावेळी म्हणाले आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ( Guardian Minister Chandrakant Dada Patil ) यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली यावेळी खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित होत्या .
पालकमंत्र्यांचे सुळेंनी माणले आभार - कुठल्याही आमदाराचा निधी रोखला जाणार नाही. कुठलेही कामे थांबवली जाणार नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन सुद्धा चंद्रकांत दादा पाटील दिलेले आहे. त्यामुळे मी पालकमंत्र्यांचे सुद्धा आभार मानते .हे काम जे आहे ते प्रत्येकाच्या मतदारसंघातील जनहिताचे आहेत असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेवरती मोठा निशाणा साधला असून, पुण्याची रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने जी झालेली अवस्था आहे. वाहतूक कोंडी आहे. या सर्वांना महानगरपालिकेत कुठलेच नियोजन नाही. त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सगळं महानगरपालिकेचा अपयश असून आपण किती दिवस पावसाला नाव ठेवणार पाऊस मोठा छोटा त्यापेक्षा तुम्ही नियोजनच केलं नाही. त्याचबरोबर स्मार्ट सिटीचा सुद्धा बोजा उडालेला आहे. हे अमृत शहर होते. विकासाचा निधी सुद्धा आला पण त्याचं काय झालं याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याच्या सुळे म्हणाल्या. आज मात्र शहराची अवस्था बकाल झाली आहे .त्याला पुणे महानगरपालिका तिथले भाजपाचे सरकार जबाबदार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे.