ETV Bharat / city

पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विक्रम कुमार हे पालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.

Pune Commissioner Shekhar Gaikwad
पुणे आयुक्त शेखर गायकवाड
author img

By

Published : Jul 11, 2020, 8:32 PM IST

पुणे - महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज (शनिवार) सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लॉकडाऊन संदर्भात वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे यापूर्वी पीएमआरडीचे सीईओ होते.

पाच महिन्यापूर्वी शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेतील आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी मावळते महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात माहिती देताना लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांची अशा प्रकारे तडकाफडकी बदली करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - 'त्यांनी यापुढेही असेच निर्णय घेतले, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल'

तसेच पुण्यातील आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पीएमआरडीच्या रिक्त झालेल्या जागी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. साखर आयुक्त सौरभ राव यांना विभागीय आयुक्त कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्त करण्यात आले. तर शेखर गायकवाड यांच्याकडेच आत पुन्हा साखर आयुक्तपद पद सोपवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.