ETV Bharat / city

पुणे व्यापारी महासंघाचा 'लॉकडाऊन'ला विरोध - pune latest news

रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

पुणे महापालिका
पुणे महापालिका
author img

By

Published : Apr 14, 2021, 3:38 PM IST

Updated : Apr 14, 2021, 4:15 PM IST

पुणे - रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

बोलताना रांका

यावेळी बोलताना म्हणाले, राज्य सरकारने उद्यापासून होणाऱ्या संचारबंदीचा जारी केलेला आदेश गोंधळात टाकणारा आहे. यावरून राज्य सरकार आणि प्रशासन संपूर्ण गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. पण, संचारबंदीच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आली नाही.

संचारबंदीतीत रिक्षा, सार्वजनिक वाहतूक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, शिवभोजन थाळी यांना सुरू ठेवण्याची परवानगी देता. हे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होईल. मग अशा परिस्थितीत संचारबंदीच्या नियमांचे पालन कसे होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग कसा रोखला जाईल, असा सवालही रांका यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध आहे. राज्य सरकारने काढलेला हा देश पूर्णपणे गोंधळात टाकणारा आहे. यातून काय चालू आहे आणि काय बंद आहे हेच कळत नाही. यावर पुणे व्यापारी महासंघाची आज (दि. 14 एप्रिल) संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू, असेही रांका म्हणाले.

हेही वाचा - राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन केल्यास पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

Last Updated : Apr 14, 2021, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.