ETV Bharat / city

President Kovind In Maharashtra : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पुण्याच्या हवाई दल तळाला भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (President Kovind In Maharashtra) आहेत. आज त्यांनी पुण्यातील हवाई दलाच्या तळाला भेट दिली.

President Kovind pune visit
President Kovind pune visit
author img

By

Published : Dec 7, 2021, 8:14 PM IST

पुणे - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (President Kovind In Maharashtra) आहेत. आज त्यांनी पुण्यातील हवाई दलाच्या तळाला भेट दिली. हवाई तळावर आगमन झाल्यानंतर दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडचे हवाई दल अधिकारी कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडच्या हवाई दल पत्नी कल्याण संघटना (प्रादेशिक) च्या अध्यक्ष डॉ. आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.

75 वर्षे' दर्शविणारा '75' हा आकडा पुण्याच्या आकाशात -

पुणे हवाई दल तळाचे दल अधिकारी कमांडिंग एअर कमोडोर एच असुदानी हे राष्ट्रपतींना संचलनाची पाहणी करण्यासाठी घेऊन गेले. या संचलनामध्ये एसयू-30 एमकेआय विमान आणि ‘मेड इन इंडिया’ आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. राष्ट्रपतींनी मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या चित्तथरारक हवाई कसरती पाहिल्या. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे' दर्शविणारा '75' हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारणारा जॅग्वार विमानाचा फ्लाय पास्ट हे हवाई कसरतींचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रपतींनी अत्याधुनिक एसयू -30 एमकेआय विमानाच्या सिम्युलेटरमधून उड्डाण केले आणि त्यांना लढाऊ विमानाची असामान्य क्षमता दाखवण्यात आली. हवाई तळावरून प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील हवाई दल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील सदस्यांशी आणि हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधला.

हेही वाचा - संजय राऊत, राहुल गांधी यांची बैठक संपली; काँग्रेसशिवाय युतीबाबत राऊत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.