ETV Bharat / city

पत्रकाराच्या 'त्या' ट्विट वरून प्रकाश जावडेकर संतापले; म्हणाले ही बेजबाबदार पत्रकारिता

author img

By

Published : Feb 7, 2021, 3:38 PM IST

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावरून प्रसिद्ध पत्रकाराने ट्विट करत पोलिसाने शेतकऱ्याला गोळी मारल्याची स्वतःची भूमिका मांडली होती. त्यावर आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी संताप व्यक्त केला...

Prakash Javadekar furious over fake news tweeted by journalist
पत्रकाराच्या 'त्या' ट्विट वरून प्रकाश जावडेकर संतापले; म्हणाले ही बेजबाबदार पत्रकारिता

पुणे : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, तो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाराने ट्विट करत म्हटले होते. त्यावर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी संताप व्यक्त करत, अशा अफवा पत्रकारांनी पसरवू नयेत आणि आपली जबाबदारी ओळखून सत्यता पडताळून मग बातम्या द्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या विरोधात टीका टिप्पणी करा. सरकारचा विरोध करतो म्हणून आम्ही विरोध करणार नाही, उलट त्याचं स्वागत आहे. असेदेखील ते यावेळी म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 55व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.

ही पत्रकारिता आहे का? जावडेकरांनी उपस्थित केला प्रश्न..

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावरून प्रसिद्ध पत्रकाराने ट्विट करत पोलिसाने शेतकऱ्याला गोळी मारल्याची स्वतःची भूमिका मांडली होती. त्यावर आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही लढाई लढली अभिव्यक्ती स्वातंत्र्यसाठी. मात्र, आता पहात आहोत की मीडिया स्वतंत्र आहे, मी त्याचा मंत्री आहे. मीडियाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे पण ती जबाबदार हवी.

जो शेतकरी अपघातात मरण पावला, त्याचा व्हिडिओ समोर आला त्यात पाहिलं की ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येते. त्यावर प्रसिद्ध पत्रकार ट्विट करतात की पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. ही स्वतंत्रता आहे? असा प्रश्न उपस्थित करत ही गैरजबाबदार पत्रकारिता असल्याचे जावडेकर म्हणाले. यामुळे देशात अशांती पसरू शकते.

अफवा पसरवणे हे स्वातंत्र्य नाही. भेदभाव तयार करणे, चुकीची बातमी करणे हे चुकीचे आहे. त्याची सत्यता पडताळा, मग, टीका टिपण्णी करा. सरकार चा विरोध करतो म्हणून आम्ही त्याचा विरोध करत नाहीत त्याचे स्वागत आहे. चुकीच्या बातम्या, भ्रम, अफवा हे पसरवणे हे काम अभिव्यक्तिस्वातंत्र्यात नसते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अशा षडयंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही..

जावडेकर पुढे म्हणाले, हे सोशल मीडियाचे दिवस आहेत, त्यात सर्व जण पारंगत आहेत. आता जे 'टुल किट'चे प्रकरण समोर आले आहे. त्या माध्यमातून ज्या संघटनांनी योजना बनविल्या होत्या की, भारताला कसे बदनाम केले जावे त्यांची पूर्ण माहिती मिळाली. भारत देश हा खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. येथील नागरिक शक्तिशाली आहेत. अशा षडयंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही. असे जावडेकर म्हणाले.

हेही वाचा : केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी : शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.