ETV Bharat / city

Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचे प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन, म्हणाले... - बाळासाहेब आंबेडकर

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ( Governor Controversial Statement ) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatshing Koshyari ) यांचे समर्थन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजप यांचं राज्यात सरकार राहील. मुख्यमंत्री देखील याच पक्षांचे राहिले आहे आहेत. अधिकांश मंत्री हे मराठा समाजाचे राहिले आहे. त्यामुळे राज्य जरी मराठ्यांचे असले तरी, आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही तर, ती राजस्थानी, गुजराथी लोकांच्या हाती म्हणून राज्यपालांची उचलबांगडी करा असे म्हणत आहे.

Prakash Ambedkar On Bhakat Singh Koshyari
बाळासाहेब आंबेडकर
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:08 PM IST

पुणे - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Controversial Statement ) यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatshing Koshyari ) यांच्यावर विविध पक्षांवर टीका केली जातं आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही - ते म्हणाले की. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजप यांचं राज्यात सरकार राहील. मुख्यमंत्री देखील याच पक्षांचे राहिले आहे आहेत. अधिकांश मंत्री हे मराठा समाजाचे राहिले आहे. त्यामुळे यांनी राज्यात राज्य कस केलं यावर केलेलं हे विधान आहे. राज्य जरी मराठ्यांचे असले तरी, आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही तर, ती राजस्थानी, गुजराथी लोकांच्या हाती आहे. हे दाखवण्यात आल आहे. त्यामुळे या सगळ्यांना आपल पित्तळ उघड पडल म्हणून राज्यपाल यांची उचलबांगडी करा अस म्हणत आहे. आम्ही राज्यपालांच्या विधानाचे समर्थन करत आहोत असे, यावेळी आंबेडकर म्हणाले.

मुंबईला काहीही फरक पडत नाही - पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुंबई आत्ता मॅन्युफॅक्चरिंग शहर राहिलेला नाही. तर, मुंबई शहर हे आता ट्रेडिंग शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे या ट्रेडिंग शहरावर कोणाचंही वर्चस्व राहिलेले नाही. त्यामुळे जरी येथील राजस्थानी गुजराथी गेले तरी, मुंबईला काहीही फरक पडत नाही असे, देखील यावेळी आंबेडकर म्हणाले. राज्यपाल यांच्या विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत असताना आंबेडकर यांनी त्यांच्या विधनाचा समर्थन केलं आहे.

महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले - आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केलं आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.

हेही वाचा -Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

संजय राऊत यांची टीका - शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावरुन राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मराठ्यांना जागे होण्याचे आवाहनही त्यांच्या वक्तव्यावरुन केले आहे. मराठी माणसाने जागे होऊन याचा तीव्र विरोध केला पाहिजे अशी अपेक्षा राऊत यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते भडकले - महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

राज्यपालांनी माफी मागावी-अमोल मिटकरी - महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मनसे नेते संदिप देशपांडेचा राज्यपालांना सल्ला - मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले, त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांनी प्रगती त्याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही त्यांची प्रगती झालेली आहे असे संदिप देशपांडे म्हणाले.

हेही वाचा - Governor Bhagat Singh Koshyari : राजकीय वातावरण तापल्यावर अखेर काय म्हणाले राज्यपाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.