कोल्हापूर - न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ शेतकऱ्यांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी गुलालाची उधळण करत हलगीच्या तालावर नाचत शेतकऱ्यांनी सरकारचे आभार मानले.
Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी; पाहा कोण काय म्हणाले ? - अजित पवार
15:00 December 16
13:30 December 16
आम्ही कोणत्याही निर्णयाचे श्रेय घेत नाही - आढळराव पाटील
'आम्ही कोणत्याही निर्णयाचे श्रेय घेत नाही. कर्नाटक सरकारला याची आधी परवानगी देण्यात आली होती. त्याचा आधार घेत महाराष्ट्रालाही परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय झाला आहे. त्याचे मी स्वागत करतो', असे माजी खासदार आढळराव पाटील (Adhalrao Patil) म्हणाले.
13:17 December 16
शेतकरी आनंदित आहेत- अजित पवार
मुंबई - राज्यातील शेतकरी अनेक वर्षे लढा देत होती. कोर्टात हा विषय असल्याने शेतकऱ्यांना नाराजी पत्करावी लागत होती. शिक्षा झाली तरीही शेतकरी बैलगाडी शर्यत (Bullock Cart Race in Mharashtra) घेत होते. अमोल कोल्हे हे सातत्याने हा विषय उचलून धरत होते. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही वकील लावले.. दिल्ली दौरे केले. काही जणांनी राजकारण केलं. खोटी पोस्टर लावली. निवडणुकीत निवडून द्या. आम्ही बैलगाडी शर्यत सुरू सुरू करू अशी आश्वासन दिली. सुप्रिम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोड्यांची रेस चालते मग बैलगाडी का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला होता. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.