पुणे - आज जे श्रीलंकेत परिस्थितीती निर्माण ( Political instability In Sri Lanka ) झाली आहे. त्यातील दोन ते तीन कारणे समोर येत आहे. श्रीलंकेवर कर्ज वाढत गेले आहे. त्यामुळे देशात महागाईने कळस गाठला आहे. त्यांचे फॉरेनस एक्सचेंज रिझल्ट कमी होत गेले आहेत. ज्यामुळे तिथं परिस्थितीती बिकट होऊ लागली. जी परिस्थितीती श्रीलंकेत निर्माण झाली आहे, तशीच परिस्थितीती भारतात देखील निर्माण शकते असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह ( Senior Congress leader Digvijay Singh ) यांनी व्यक्त केलं आहे. भारताचे कर्ज 36 लाख करोड वरून 80 लाख करोडवर गेले आहे. दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ होताना दिसत आहे. जर, मोदी सरकारने केंद्रात लक्ष दिले नाही तर, श्रीलंकेसारखी परिस्थीतीती भारतात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असेही सिंह म्हणाले. ते आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदे बोलत होते.
देशात लोकतंत्र नव्हे तर धनतंत्र सुरू - गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या संपर्कात असून या मंत्र्यांनी भाजपाकडे तीन कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर दिग्विजय सिंह ( Digvijay Singh ) यांना विचारलं असता ते म्हणाले की, जे आमदार गेले आहेत. त्यातील किती लोकांवर ईडीच्या तक्रारी आहे? किती लोकांवर छापे टाकले आहे? सध्या भाजपकडून ( BJP ) जे सुरू आहे ते लोकतंत्र नव्हे तर धनतंत्र सुरू असल्याची टीका देखील सिंह यांनी केली.
यावेळी सिंह यांनी राज्यातील शिंदे सरकारवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, संपूर्ण देश हे आत्ता बघणार आहे की, कशा पद्धतीनेही सरकार चालणार आहे. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जी परिस्थितीती झाली आहे. त्यावर दया येत आहे. जो माणूस मुख्यमंत्री होता त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या व्यक्तीने मंत्री म्हणून काम केलं त्या व्यक्तीच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस यांना आत्ता काम करावं लागणार आहे. यामागे काय कारणे आहेत हा विषय वेगळा आहे पण जर, मी त्यांच्या जागी असतो तर हे स्वीकार केलं नसत. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जाणूनबुजून अपमानित केलं आहे. हे त्यांच्या चेहेऱ्यावरून देखील लक्षात येत आहे असे सिंह म्हणाले.
हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...