पुणे: गाडी बाजूला घेण्याच्या कारणातून झालेल्या वादात पेट्रोल पंपचालकाला मारहाण Police Beaten Petrol Pump owner in Pune करून त्याच्या विरुद्धच खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार्या पोलिसावरच आता पाच लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (Extortion Case on Pune Police employee) झाला आहे. खात्याअंतर्गत केलेल्या चौकशीत (Extortionist Police Investigation) हा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित कर्मचार्याला पोलिस खात्यातून देखील निलंबित (Extortionist Police Suspension Pune) करण्यात आले आहे. latest crime news Pune
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल- प्रदीप रावसाहेब मोटे (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्माचार्याचे नाव आहे. याबाबत लोहगाव येथील पेट्रोप पंपचालक काळूराम दत्तात्रय खांदवे (वय 35, रा. कोपरआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात (दि.19) लोहगाव परिसरातील जगद्गुरु पेट्रोलपंपासमोर घडला होता. मागच्या महिन्यात पेट्रोल पंपासमोर लावलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत पाच जणांनी मिळून पोलिस कर्मचार्याला मारहाण केली होती. याबाबत मोटे याने दिलेल्या फिर्यादीनुसार कालिदास खांदवे, माऊली खांदवे व इतर तिघे अशा पाच जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस कर्मचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला होता.
हप्ता देण्यासाठी पेट्रोलपंप चालकाला धमकावले- खांदवे यांचा लोहगाव भागात पेट्रोल पंप आहे. 18 तारखेला पोलीस कर्मचारी मोटे खांदवे यांच्या पंपावर आला. मी पोलीस आहे, तुमचा पेट्रोल पंप चांगला चालतो. कोणी तुम्हाला त्रास देऊ नये आणि आमचीही चलती राहावी यासाठी दरमहा हप्ता द्यावा लागेल, असे सांगत मोटे याने खांदवेना दम भरला. हप्ता देण्याची पध्दत माहित नाही का, असे म्हणत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. या वादात मोटे यांनी खांदवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानूसार मोटे यांच्या विरोधात खंडणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हप्त्याऐवजी निलंबनाची कारवाई - हा प्रकार घडल्यानंतर मोटे याची झालेली बदली रद्द करून मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला खात्यातून देखील निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.