ETV Bharat / city

Video : गौरीकुंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन यात्रेकरुंची पोलींसानी केली सुखरुप मुक्तता - दोन महाराष्ट्रीयन यात्रेकरु वाचले

पोलिसांनी केदारनाथमध्ये अडकलेल्या दोघा महाराष्ट्रीयन व्यक्तींची सुटका केली आहे. केदारनाथ मंदिरापासून गौरीकुंडच्या दिशेने परत येत असताना, दोन्ही प्रवासी भटकल्यानंतर अडकले होते.

महाराष्ट्रीयन यात्रेकरुंची पोलींसानी केली सुखरुप मुक्तता

author img

By

Published : Oct 16, 2021, 8:53 PM IST

रुद्रप्रयाग - केदनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी देवदूत म्हणून पोलीस आणि एसडीआरएफचे जवान पुढे येत आहेत. जवान यात्रेकरूंच्या मदतीसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात आणि बचाव कार्यात गुंतलेले असतात. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून येणाऱ्या यात्रेकरूंना गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि एसडीआरएफचे जवान यात्रेकरूंच्या सेवेत गुंतले आहेत.

हे लक्षात घेतले पाहिजे की केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दररोज वाढत आहे. आता दररोज सुमारे दहा ते अकरा हजार यात्रेकरू धाम येथे पोहोचत आहेत. बहुतांश यात्रेकरु गौरीकुंड ते केदारनाथ पायी चालत करीत आहेत. मात्र, यात्रेकरूंना पायी मार्गावरही अडचणी येत आहेत.

अशा परिस्थितीत, पोलिस आणि एसडीआरएफ टीम त्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. काल रात्री एसडीआरएफ टीमला गरुड चट्टीजवळ यात्रेकरुचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळाल्यानंतर लिंचोली येथील हेड कॉन्स्टेबल प्रेम प्रकाश यांची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. बचाव पथकाकडून गरुड चट्टी पुलापासून भैरव हिमनगापर्यंत नदीत शोध घेण्यात आला, परंतु शोधादरम्यान कोणीही सापडले नाही. काही वेळानंतर कळले की ही माहिती गरुड चट्टी पुलाची नसून छोटी लिंचोलीच्या खाली असलेल्या नदीची आहे. बचाव पथकाला योग्य माहिती मिळताच, कोणताही वेळ वाया न घालवता, लगेच छोट्या लिंचोलीपासून खाली नदीत शोध सुरू केला. शोधा दरम्यान, दोन व्यक्ती नदीच्या दुसऱ्या बाजूला अडकलेल्या दिसल्या.

दोरीच्या सहाय्याने टीमने दोन्ही व्यक्तींची सुखरूप सुटका केली. यात्रेकरु रामदास पठारे यांचा मुलगा दत्तू, आणि यशवंत दाभारे यांचा मुलगा पांडुरंग, दोघेही राहणार राहणार तळेगाव, दाभाडे, पुणे महाराष्ट्र यानी आपली सुटका कशी झाली याबद्दल सांगितले. यात्रेकरु पांडूरंग याने सांगितले की, तो केदारनाथ यात्रेसाठी पुणे महाराष्ट्रातून उत्तराखंडला आला होता. केदारनाथ मंदिरापासून गौरीकुंडच्या दिशेने परत येताना, आपला मुख्य रस्ता सोडून नदीच्या काठावर चालत असताना, पटकन खाली जाण्याच्या प्रयत्नात, त्याने आपला मार्ग गमावला आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला अडकला.

बचाव पथकाने दोरखंडाने दोघांना सुखरूप बाहेर काढले. अशा परिस्थितीत यात्रेकरुंचे प्राण वेळेत वाचले. दोन्ही यात्रेकरुंनी यशस्वी बचावासाठी एसडीआरएफ आणि पोलीस टीमचे आभार मानले. या टीममध्ये कॉन्स्टेबल नवीन कुमार, कॉन्स्टेबल रमेश रावत, कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंह आणि मुख्य कॉन्स्टेबल प्रेम प्रकाश यांचा कॉन्स्टेबल प्रीतम यांचा समावेश होता.

हेही वाचा - Cruise Drug Case : एनसीबी कारवाईतील पंच फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.