पुणे - शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत आहे. दरोरोज 500 ते 600 रुग्ण शहरात सापडत आहेत. नागरिकांनी कोरोनाबाबतीच्या नियमांचे पालन करावे यासाठी आज शहरातील विविध रस्त्यांवर पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सच्या माध्यमातून पथसंचालन करून जनजागृती करण्यात आली.
आम्हीही आपल्याबरोबर हा संदेश देण्यासाठी रॅपीट ऍक्शन फोर्सतर्फे पथसंचलन -
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार रॅपिड फोर्स आणि पोलिसांनी मिळून रूट मार्च केले आहे. पुण्यातील नवी पेठ परिसरात पथ संचलन करण्यात आले आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स संरक्षण विभागातील एक खात असून नागरिकांना एक संदेश जावा यासाठी आम्हीही आपल्या बरोबर आहो म्हणून आज रॅपिड ऍक्शन फोर्स आणि पुणे पोलीस यांच्याकडून पथसंचलन करण्यात आले आहे.
संवेदनशील शहरात वर्षातून एकदातरी पथसंचलन -
राज्यात जी शहरे संवेदनशील आहेत या शहरात वर्षातून एकदा तरी रॅपिड ऍक्शन फोर्स कडून शहराच्या विविध भागात पथसंचलन करण्यात येत असते. मुंबईतील तळोजा येथील रॅपिड ऍक्शन फोर्स विभागातील जवानांनी आज पुण्यात येऊन नवी पेठ या परिसरात संचलन केले आणि शहरातील विविध भागाची पाहणी केली. आम्ही नागरिकांबरोबरच आहो हा संदेश देण्यासाठीही आम्ही पथ संचलन करत असतो. नागरिकांच्या मनात आमच्या बद्दल भीती निर्माण झालेली असते ती भीती दूर व्हावी आणि आम्हीही आपल्यापैकीच एक आहोत आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत यासाठी आम्ही पथ संचालन केल आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे -
शहरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अजून ही अनेक नागरिक बाजारपेठ, रस्त्यांवर फिरताना विना मास्क फिरत आहे. पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.