पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीमध्ये दिवसा हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा, मात्र रात्री दुचाकी चोरी करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. अटकेनंतर पोलिसांनी या चोराकडून १० लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
हेही वाचा... सेल्समन बनून घरफोडी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला बेड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून तो दिवसा हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत असे. बुद्धदेव विष्णू विश्वास (२१) असे या आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून १३ महागड्या दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले, असा एकूण १० लाख ९० हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा... लातूर : मुरूडमध्ये दुकान मालकाकडून २० वर्षीय कामगाराची हत्या
शहरात खासगी वाहनाने गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी मावसकर यांना एका बातमीदारामार्फत या चोराची माहिती मिळाली. तो शहरात गाडीवर फिरत असल्याचे पोलिसांना समजले, त्यांनतर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने स्वतःचे नाव बुद्धदेव विष्णू विश्वास असे नाव सांगितले. तसेच त्याच्याकडे दोन मोबाईल आढळून आले. त्याच्या जवळ असलेल्या बुलेट गाडीची चौकशी केली असता, त्याने व्यवस्थित माहिती दिली नाही.
हेही वाचा... पुण्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना विविध ठिकाणाहून अटक, 28 लाखांचे मादक पदार्थ जप्त
पोलिसांनी अखेर त्याला निगडी पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. तेव्हा निगडी, वाकड, सांगवी, हिंजवडी, डेक्कन, देहूरोड या भागातून त्याने आपण १३ दुचाकी व एक मोबाईल चोरल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून १० लाख ९० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तसेच त्याच्या अटकेमुळे विविध पोलीस ठाण्यातील १० गुन्हे उघड झाले आहेत. ही कामगिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली.