ETV Bharat / city

पीएमपीएमएलकडे इंधन, वेतनासाठीही नाहीत पैसे.. दोन्ही महापालिकांकडे तब्बल 183 कोटींची थकबाकी

पुणेकरांची लाईफलाइन म्हणून या पीएमपीएमएल बसकडे पाहिलं जातं. कोरोनाच्या संकटात बंद पडलेली वाहतूक सेवेमुळे पीएमपीएमएलचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता तर इंधन व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नसल्याचे सांगितले जात आहे.

PMPML bus service
पीएमपीएमएल बससेवा
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:38 PM IST

पुणे - पुण्याची लाईफलाइन म्हणून पीएमपीएमएल बससेवेला ओळखलं जातं. आधीच लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कंबरड मोडलं असताना आता प्रवाशांअभावी तोट्यात सुरु असलेली पीएमपीएमएल पैशाअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे.

पीएमपीएमएल आर्थिक संकटात
पुणेकरांची लाईफलाइन म्हणून या पीएमपीएमएल बसकडे पाहिलं जातं. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते काही साध्य झाले नाही आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटात बंद पडलेली वाहतूक सेवा यामुळे पीएमपीच्या बसची चाकं पंक्चर होण्याची वेळ आली. याचं कारण असे, की 2 मार्चपासून पुणे महानगरपालिका आणि पिपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून तब्बल 183 कोटी रुपये येणं बाकी आहे. दोन्ही महापालिकांना कोरोनाच्या काळात बस आणि कर्मचारी देण्यात आले. त्यापोटी एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे बस चालविणे कठीण झाले आहे. इंधन, वेतन तसेच आरोग्य योजनांसाठी पैसे नाहीत. सुमारे ९० कोटी रुपयांचे देणे आहे. रोख पैशांशिवाय डिझेल मिळत नाही. एमएनजीएल कंपनीने सीएनजीचे ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास गॅसपुरवठा थांबविण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आतापर्यंत वेळेवर पगार होत असलेल्या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून पगारासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची वेळ आली आहे.
कुठलीही थकबाकी नाही - महापौर
पुणे महानगरपालिकेने मात्र पीएमपीएमएलची कुठलीही थकबाकी नसल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षीची संचलन तूट ही पालिकेने आधीच दिलेली आहे. या वर्षीची संचालन तूट पुढच्या वर्षी दिली जाते, असं सांगत राज्य सरकारने आता पीएमपीएमएलला आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचं सांगत महापौरानी आपली जबाबदारी झटकली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.