पुणे - देशात जे बदल घडले आहे त्याचे श्रेय युवकांना जाते. ज्या क्षेत्रात भारत कधीही पुढे जायचे विचार करत नव्हते, त्या क्षेत्रात आज युवकांमुळे भारत पुढे आहे. आज परिस्थितीत बदल झाले आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण एका नवीन भारताच्या निर्मिती आणि नवीन लक्षांसह पुढे चाललो आहोत. याचे नेतृत्व युवकांनीच करायचे आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा. स्थानिक समस्या आणि देशाच्या छोट्या छोट्या समस्या सोडवायला हव्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm narendra modi visit Symbiosis University ) यांनी विद्यार्थ्यांना केले.
हेही वाचा - Ajit Pawar Demand Pm Modi : अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या 'या' मागण्या
लवळे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने तसेच, सिम्बॉयसिस आरोग्य धामचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सिम्बॉयसिस कॉलेजचे अध्यक्ष मुजुमदार आदी उपस्थित होते.
आजचा भारत इनोव्हेट करत आहे
आज आपला देश जगातील सर्वात मोठ्या इकॉनॉमींमध्ये सहभागी आहे. जगातील सर्वात मोठा तिसरा स्टार्टअप इकोसिस्टम आज आपल्या देशात आहे. स्टार्टअप इंडिया, मेकइन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत सारख्या मिशनचे प्रतिनिधित्व करत आहे. आजचा भारत इनोव्हेट करत आहे आणि संपूर्ण जगाला इन्फ्लुअन्स देखील करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भारताने व्हॅक्सिनच्या माध्यमातून जगाला आपले सामर्थ्य दाखवले आहे. आज रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यावेळेस ऑप्रेशन गंगाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. भारताचा प्रभाव वाढत असून आपण आज हजारो विद्यार्थ्यांना परत आणले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आरोग्य धाम देशासाठी मॉडेल आहे
सिम्बॉयसिस महाविद्यालयाने सुरू केलेल आरोग्य धाम देशासाठी मॉडेल आहे. दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्यावर काम करण्याचा उपक्रम सिम्बॉयसिसने घ्यावा. पुढील पाच वर्षांच्या संकल्पना आताच ठरवाव्यात. उदाहरणार्थ ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात वेगवेगळे अभ्यास, केलेल्या अभ्यासाचे अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवा. खूप काही होऊ शकते याची मला खात्री आहे, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा - Kalagaurav Award : शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना राम कदम कलागौरव पुरस्कार जाहीर