पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचे उद्घाटन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच अनेक विकासकामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आज नरेंद्र मोदी जवळपास 5 तास पुण्यात असणार आहेत. त्याच अनुषंगाने प्रशासन देखील जोरदार तयारीला लागलेल पाहायला मिळत आहे.
सकाळी सुमारे साडे दहाच्या सुमारास मोदी पुण्यात येणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ते करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या दौऱ्यातला मुख्य कार्यक्रम म्हणजे पुणे मेट्रोच अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. मोदी स्वतः मेट्रोने प्रवास करत आनंदनगर पर्यंत जाणार आहेत.
- सकाळी 10.25 - लोहगाव विमानतळावर आगमन
- सकाळी 10.45 - हेलिकॉप्ट ने कृषी महाविद्यालय येथे आगमन
- सकाळी 11.00 - मनपा आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
- सकाळी 11.30 - मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन (गरवारे ते आनंदनगर मेट्रो प्रवास)
- दुपारी 12.00 - एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात उपस्थिती
- दुपारी 12.30 - 100 इलेक्ट्रीक बस आणि ई-बस डेपोचे लोकार्पण
- दुपारी 1.45 - सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती
- दुपारी 2.30 - पुणे लोहगाव विमानतळ येथून दिल्लीकडे प्रस्थान