ETV Bharat / city

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त झाले "मटणवाले चाचा",  पोलिसांची घेतली शाळा

खुद्द पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करत पोलिसांच्या तत्परतेची पाहणी केली. तसेच तक्रार घेण्यास चालढकल कराल तर खबरदार, असा इशाराच दिला आहे.

author img

By

Published : May 8, 2021, 7:31 AM IST

Updated : May 8, 2021, 7:07 PM IST

वेषांतर करून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पोलीस ठाण्यात

पुणे - उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडचा मोठा विस्तार झालेला आहे. देश भरातून नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत, अशा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील भरपूर वाढले आहे. परिणामी इथल्या पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या लहान मोठ्या तक्रारी घेऊन नागरिक जात असतात. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दाद मिळणे गरजेचे असते, पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण तुमच्या पुढे तक्रार देण्यास बसलेले तक्रारदार हे चक्क तुमचे वरिष्ठ अधिकारी देखील असू शकतात. याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड पोलिसांना नुकताच आला आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त खुद्द कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करत पोलिसांच्या तत्परतेची पाहणी केली. तसेच तक्रार घेण्यास चालढकल कराल तर खबरदार, असा इशाराच पोलीस दलाला आपल्या कृतीमधुन दिला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ट्रिअथलॉन स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारे भारतीय संरक्षण दलातील ते पहिले अधिकारी आहेत.

बुधवारी रात्री साडे बारा वाजता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करुन पिंपरी पोलीस ठाण्याला भेट दिली. पिवळ्या रंगाचा सलवार कुडता, लालसर रंगाचा डोक्यावर विग, त्यावर पांढरी गोल टोपी आणि दाढी अशा पेहराव करुन ते चक्क मटण वाले चाचा बनले आणि सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी चाचाची बीवी बनुन शहरातील तीन पोलीस ठाण्यात प्रवेश केला.

2 पोलीस ठाण्यात चांगली वागणूक

हिंजवडी पोलिसात जाऊन या भूमिकेतील चाचाने काही जण बायकोची छेड काढत असल्याची तक्रार दिली, तर त्यानंतर पुढे वाकड पोलीस स्टेशनला जाऊन चेन चोरीची तक्रार दिली, तसेच पिपरी पोलीस ठाण्यात जाऊन रुग्णवाहिका चालकासंबंधी तक्रार सांगितली. यातल्या दोन पोलीस स्टेशनला चांगला अनुभव आला, तर एका ठिकाणी वाईट अनुभव आल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांशी पोलीस कसे वागतात हे जाणून घेण्यासाठी वेषांतर करत पाहणी केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरात सुरु असलेल्या काळ्या धंद्यांवर देखील अशा प्रकारची कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Last Updated : May 8, 2021, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.