ETV Bharat / city

Pune Crime : दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या तोतया माहिती अधिकाऱ्याला पुण्यात अटक - Information Officer

दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील,असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची ( Information Officer ) बतावणी करुन बांधकाम ठेकेदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने ( Anti Extortion Squad ) पकडले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( Bharti University Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

person who Demanded Ransom Of Two Crores was Arrested
न कोटीची खंडणी मागणाऱ्यास अटक
author img

By

Published : Jul 21, 2022, 9:58 AM IST

पुणे : तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे. परवानगी घेण्यात आली नाही. तसेच उत्खननाचे शुल्क भरण्यात आले नाही. दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील,असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्ता (Information Officer) असल्याची बतावणी करुन बांधकाम ठेकेदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी ( Demanded Ransom Of Two Crores Was Arrested ) मागणाऱ्या ( Arrested for demanding Rs 2 crore ) एकास खंडणी विरोधी पथकाने पकडले. दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाकडे ( Anti Extortion Squad ) तक्रार दिली होती.

तक्रारदार राष्ट्रीय महामार्गाचे काम करतात. नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात तक्रारदाराच्या कंपनीकडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. आरोपी फाळके ठेकेदाराला भेटला आणि दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी फाळकेने ठेकेदाराला दिली. त्यानंतर ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली. पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा ( Trap on Pune-Satara road ) लावला. ठेकेदाराने खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी फाळकेला कदम प्लाझा इमारतीजवळ बाेलावले. ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी घेताना फाळकेला पकडण्यात आले.

पुणे येथे 2 कोटीची खंडणी मागणाऱ्यास अटक

यांनी घेतला कारवाईत सहभाग- या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा ( Bharti University Police Station ) दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहन जाधव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, विजय गुरव, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा : धक्कादायक! वाहनाचा वेग कमी करताना दुचाकीला पाठीमागून कंटेनरची धडक; पुण्यात बापलेकीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.