ETV Bharat / city

महाराष्ट्रातील जनता ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी - उदय सामंत - Aditya Thackeray News

उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्षात उत्तम समन्वय असून अतिशय उत्तमरीत्या कामकाज सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याचे जे कोणी सांगत आहे, ते यातून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Aug 13, 2020, 5:40 PM IST

पुणे - ठाकरे कुटुंबीयांना संपूर्ण देश ओळखतो त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु असं असलं तरी महाराष्ट्रातील जनता विरोधकांच्या आरोपांमुळे चलबिचल होणार नाही. अधिक ताकदीने महाराष्ट्रातील जनता ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी उभी राहील. असा विश्वास तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्षात उत्तम समन्वय असून अतिशय उत्तमरीत्या कामकाज सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याचे जे कोणी सांगत आहे, ते यातून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोकणी जनता शिवसेनेसोबत

मुंबईतील जवळपास 70 टक्के कोकणी जनता गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. महाविकासआघाडी तीनही पक्ष कोकणवासियांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. त्यामुळे विरोधकांनी कोकणी लोकांविषयी कसलीही टीका करू नये. कोकणी जनता आजही शिवसेनेसोबतच असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला.

आदित्य ठाकरे यांची निवड योग्य

पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीवर आदित्य ठाकरेंची निवड योग्यच आहे. तरुण आणि प्रतिभा असलेल्या नेतृत्वावर विश्वास टाकायलाच हवा. तसेच टीका करणार्‍यांवर लक्ष देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. उद्या कोर्टात तारीख असल्यामुळे आज मी त्या विभागाचा प्रमुख असल्याने बोलणे उचित नाही. परीक्षेसंबंधी जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आत्ता करतोय. कोविडची परिस्थिती बघता परीक्षा घेता येणार नाही, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिलेय.

सीईटीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल

सीईटी बाबत अभियान सुरू आहे. याबाबत सात ते आठ दिवसांत निर्णय होईल. तालुका स्तरावर सीईटी घेता येऊ शकेल. सीईटीची स्वायत्त संस्था आहे. त्यांना वैयक्तिक अधिकार आहे. आणिबाणीची स्थिती बघून बारावीसाठी सीईटी रद्द करण्याचा विचार करतोय. याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.