पुणे - पुण्यातील उन्हाचा कडाका अन् त्यात 1 ते 4 ची निवांत वामकुक्षी. टाचणी पडली तरी झोप मोडली म्हणून आकांडतांडव करणारे पुणेकर मात्र अनेक दिवसांपासून 1 ते 4 वेळेत सुमधुर बासरीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन जागे होतात. भर उन्हात 65 वर्षीय परमेश्वर शिंदे हे शहरातील विविध वस्तीत जाऊन बासरी वादन करतात. या मधुर बासरी वादनामागे कोणताही स्वार्थ नाही. स्वत:ला असलेला छद जोपासता यावा आणि लोकांनाही आपल्या कलेच्या माध्यमातून आनंद बहाल करता यावा, हाच उद्देश या बासरी वादनामागे असल्याचा परमेश्वर शिंदे सांगतात.
प्रशिक्षण न घेता बासरीचे वादन : अगदी मास्टर दीनानाथ मंगेशकर, वसंतराव देशपांडे ते आज राहुल देशपांडे यांच्यापर्यंत पुण्याला सुरेल इतिहास आहे. याच दैदिप्यमान इतिहासात खारीचा वाटा परमेश्वर शिंदे उचलत आहेत. परमेश्वर शिंदे यांनी कुठेही बासरीचे प्रशिक्षण घेतलेल नाही. तर त्यांनी बासरी वादन हे स्वतः शिकले आणि ते कला म्हणून भर उन्हात जाऊन बासरी वाजवत आहे. विशेष म्हणजे ते बासरी वादन पैसे मिळावे म्हणून करत नाही, तर त्यांना त्यांच्यातील कला जोपासायची आहे. त्यांना तर बासरीत प्रकार असतात हे देखील माहीत नाही.
हेही वाचा - VIDEO : मुंबईकरांना मास्कसह मार्शलपासूनही मिळणार सुटका