ETV Bharat / city

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची चौकशी - शरद पवार रुबी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत . भारत भालके यांना कोरोना झाल्यानंतर आधी पंढरपूर मध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले.

Bharat Bhalke's condition is critical
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:30 PM IST

Updated : Nov 27, 2020, 5:37 PM IST

पुणे - पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये भारत भालके यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिली आहे.

शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन केली आमदार भालकेंच्या प्रकृतीची चौकशी

प्रकृतीबाबत समाज माध्यमातून उलट-सुलट चर्चा -

आमदार भालके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत आज सकाळपासून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आमदार भालके गेल्याच महिन्यात कोरोनातून बरे झाले होते, पण पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुण्यातील रुबी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भालके यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रुबी हॉलमध्ये हजेरी लावली तसेच भालके यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान पवार यांच्या भेटीनंतर रुबी हॉल क्लिनिकच्या डाक्टरांनी भालके यांच्या प्रकृती बाबत भाष्य करत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 5:37 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.