ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार अध्यादेश काढणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा न ओलांडता ओबीसींना आरक्षण देणार असे त्यांनी म्हटले आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याची माहिती दिली आहे. याला कोर्टात आव्हान दिलं तरी ते कोर्टात टिकेल असे ते म्हणाले.
Breaking News - ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार अध्यादेश काढणार
18:08 September 15
15:33 September 15
Breaking News - माहिती गोळा करण्यासाठी आमचे पथक दिल्लीला जाणार -एटीएस
मुंबई - आरोपी रेल्वेने प्रवास करत असताना त्याला अटक केली. तो धारावीत राहत होता. परंतु, या प्रकरणाविषयी जी काही लिंक असेल ती दिल्ली पोलिसांना माहिती आहे. सध्यातरी आमच्याकडे याविषयी अधिकची माहिती नाही. आमचे पथक याविषयी अधिकची माहिती घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी आमच्याकडील माहिती दिल्ली पोलिसांना देऊ आणि त्यांच्याकडील माहिती आम्ही घेऊ, अशी माहिती एटीएस पथकाने पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच, पुर्ण माहिती नसल्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही असेही ते म्हणाले आहेत.
13:14 September 15
एटीएस प्रमुख दुपारी तीन वाजता घेणार पत्रकार परिषद, दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्याची शक्यता
नागपूर - एटीएस प्रमुख दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मुंबई कनेक्शनबद्दल माहिती देतील. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
13:01 September 15
नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन
नागपूर - नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन
आंदोलनात संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्ता अडवून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला केले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. राज्यात यापुढे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना फिरु देणार नसल्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.
12:27 September 15
गृहमंत्र्यांनी बोलवली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक
मुंबई - गृहमंत्र्यांनी बोलवली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक. दहशतवादी कारवायांबाबत बोलावली बैठक. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचा मुंबईशी संबंध असल्याने, त्यावर बैठकीत महत्वपुर्ण चर्चा होण्याची शक्यता. दहशतवाद्यांना दाऊद इब्राहिमची मदत असल्याची पोलिसांची माहिती. मुंबई सीपी हेमंत नागराळे, ATS प्रमुख विनीत अग्रवाल बैठकीला राहणार उपस्थित.
12:14 September 15
पेग्विंनबाबत टेंडर मागे घेतलेले नाही, रिव्हीव वाढलाय -किशोरी पेडणेकर
मुंबई - महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की आपण पेग्विंनबाबत टेंडर मागे घेतलेले नसून, रिव्हीव वाढवला आहे. दरम्यान, हा एक पर्यटन विषय आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी देशातील लोक येतात. सुरुवातीला ८ पेंग्विन होते. आता सर्व मिळून ९ पेंग्विंन आहेत.
11:40 September 15
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभरात भाजपचे आंदोलन
औरंगाबाद - ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभरात भाजपचे आंदोलन. औरंगाबदमधून आंदोलनाला सरूवात, तर पुण्यात गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू.
09:42 September 15
पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई, 3 लाख रुपयांचे मेफेड्रोन विकल्याच्या आरोपाखाली एकाला केली अटक
पुणे - शहर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने वडेगाव परिसरातून एका 60 वर्षीय व्यक्तीला 3 लाख रुपयांचे मेफेड्रोन विकल्याच्या आरोपाखाली अटक केली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.