पुणे - लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन (Life Saving Foundation), पुणे पोलीस (वाहतूक शाखा) (Pune Traffic Police) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार (Navchaitanya Hassyayog parivar) यांच्यावतीने 'नो हाँकीग डे' (No Hoking Day) अर्थात पुण्यात 'हॉर्न ठेवा एक दिवस बंद' अशी संकल्पना राबवत जनजागृती करण्यात आली. पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी 'नो हाँकीग डे' ( No Hacking Day Awareness Campaign In Pune) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. पद्माकर पुंडे यांनी केले.
रोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा वाजवला जातो हॉर्न -
पुण्यात साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिकमध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना बऱ्याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते. त्यामुळे 'नो हॉर्न' या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोथरुड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता येथे एकाच वेळी जनजागृती करण्यात आली, असे यावेळी देवेंद्र पाठक म्हणाले.
म्हणून 'नो हॉकिंग डे' उपक्रम -
मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी 'नो हाँकींग डे पाळण्यात आला. सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्नचा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.
हेही वाचा - MHADA Paper Leak Case : पेपर फोडणाऱ्या 6 आरोपींना अटक; 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी