मुंबई/नागपूर - अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदान परवानगी याचिकेवर निर्णय अद्याप झालेला ( Rajya Sabha voting ) नाही. ईडीने उत्तर दाखल करण्याकरिता 7 जूनपर्यंत वेळ मागितला आहे. आता या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीकरिता 10 जून रोजी मतदान होणार आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचे टेशन वाढले आहे.
कोर्ट त्यांना क्लीन चिट देईल - आमचे दोन नेते (नवाब मलिक आणि अनिल देशमुख) ज्यांनी काहीही केले नाही ते तुरुंगात अडकले आहेत. देशमुख कुटुंबावर १०९ वेळा छापे टाकून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवावे... आज ना उद्या कोर्ट त्यांना क्लीन चिट देईल. केंद्राच्या विरोधात बोलणाऱ्यावर छापेमारी होते अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
108 वेळा छापे टाकले तरी काहीच मिळाले नाही - ज्या माणसावर आरोप होता तोच मात्र माफीचा साक्षीदार होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात 109 वेळा छापा टाकण्यात आला. हा कदाचित जगातील विक्रम असावा. नेमका त्यांचावर गुन्हा काय अजून कळलेले नाही. नवाब मलिक यांच्या नागपूरच्या एका नेत्याने देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली की सुरुवातीला तीनशे कोटींचा आरोप केला. त्यानंतर मग तो 55 लाखाचा झाला आणि आता तो पाच लाखाचा आकडा समोर येतोय. त्यामुळे किती आकडा आहे, हे तरी स्पष्ट झाला पाहिजे. अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा छापे घातले म्हणजेच 108 वेळा काहीच मिळाले नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.आमचा न्यायपालिकेकर विश्वास आहे. मात्रज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे,असे आजवर कधी होताना पाहिले नाही. असेही सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.
चंद्रपूर दौरा - देशामध्ये राज्यात अनेक पक्ष काम करतात, त्या प्रत्येक पक्षातील नेत्यांना, पदाधिकारी यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा असे वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना यात गैर काही नाही असे मत सुप्रिया सुळे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्या आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
भाजपावर टीका - राज्यसभा निवडणुकीमध्ये घोडेबाजार होत आहेत. महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःहून भेटायला जाऊन मनाचा मोठेपणा दाखवला. राज्यसभा निवडणुकीतून यात सुवर्ण मध्य काढुयात म्हणून गेले. दुर्दैव आहे अनेक वर्षात पहिल्यादा असे घडले पण काहीच झाले नाही, त्यामुळे कुठल्याही राज्यासाठी ही हिताची नाही असेही ते म्हणालेत.
गुंडाना राष्ट्रवादीत प्रवेश नाही - राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना ईडीने अटक करत अन्याय केला आहे. पण त्यांना राज्यसभेत मतदानाला अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना संधी द्यावी यासाठी पक्षातील नेते छगन भुजबळ प्रयत्न करत फॉलोअप घेत आहेत. कोणीही काही बोलत असेल त्यावर महाविकास आघाडीचे नेते चर्चा करत असतात. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राष्ट्रवादी प्रवेश दिला जात आहे. नुकत्याच एकाला नागपुरातही अटक झाली. यावर पक्ष नोंद घेत असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील योग्य ती कारवाई करेल असेही सुचक वक्तव्य केलेत.
370 हटवले तरीही शांतता नाही - पंचावन्न वर्ष त्यांनी देशाच्या राजकारणात सक्रिय शरद पवार यांनी सहभाग दिला आहे. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही म्हणून अनेकजण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करतात. असे प्रत्युत्तर त्यांनी पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलेत. कश्मिरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर आजही शांतता पसरलेली नाही. ज्या पद्धतीने फिल्म प्रमोशन केले जात होतो तशी कुठलीही परिस्थिती काश्मीरमध्ये नाही मोठ्या प्रमाणात तिथे अजूनही हत्या होत आहे. मागील काही दिवसात चार ते पाच लोकांना जीव गेला आहे.
हेही वाचा - अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा व्हिडिओ