ETV Bharat / city

Nitin Gadkari on Pune to Bangalore पुणे, बंगलोर प्रवास फक्त साडेतीन तासात, नितीन गडकरींची घोषणा - चाकण एमआयडीसी

नाशिक, अहमदनगर नवीन हायवे Nashik Ahmednagar New Highway करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी केली आहे. ते आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Sep 2, 2022, 2:55 PM IST

Updated : Sep 2, 2022, 3:43 PM IST

पुणे - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी Union Road and Transport Minister Nitin Gadkari हे नेहेमी आपल्या कामातून ओळखले जातात. आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुरत, नाशिक, अहमदनगर नवीन हायवे Nashik Ahmednagar New Highway करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हायवेवर होणारी वाहतूक कोंडी, पुणे, मुंबई शहरात होणार प्रदुषण Pollution reduce In Pune, Mumbai कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे आत्ता या नवीन हायवेमुळे पुणे बेंगलोर प्रवास साडे तीन तासात करण्याचा मानस असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे, बंगलोर प्रवासाविषयी माहिती देताना

पुण्यात लॉजिस्टिक पार्क - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील वाहतूकचा प्रश्न सोडवण्यासाठी आज बैठक बोलवली. तसेच यावेळी पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा देखील घेतला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता, तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्यासाठी विचार चालू असल्याचं यावेळी गडकरी म्हणाले. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने, मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करण्याची विनंंती त्यांनी केली. पुणे विभागात एनएचएआयच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी मनपाने जागा दिली तर, दोन लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचं देखील गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा - Ajit Pawar on Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवारांचे भाष्य

इलेक्ट्रिक बस - तसेच पुण्यात इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे. नॅशनल हायवेच्या बाजूला जागा दिली तर. त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. चाकण एमआयडीसी Chakan MIDC पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितल.

हेही वाचा - FTII Student Suicide : नैनितालमधील तरुणीची एफटीआयआयमध्ये आत्महत्या, बेडशीटच्या मदतीने घेतला गळफास; PM रिपोर्ट आला समोर

Last Updated : Sep 2, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.