ETV Bharat / city

Union Minister Nirmala Sitharaman : शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातच भाजपाचे लोकसभा मिशन, निर्मला सीतारामन देणार भेट

Union Minister Nirmala Sitharaman : राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक भाजप प्रणित एनडीएने जिंकली आहे. आता भाजपने आगामी निवडणुकांवर आपला फोकस केला आहे. खास करून महाराष्ट्राकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे बारकाईने लक्ष आहे. आता भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. कारण केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या महाराष्ट्रात तीन दिवस मुक्कामी दौऱ्यावर येत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
author img

By

Published : Aug 7, 2022, 6:32 AM IST

Updated : Aug 7, 2022, 8:01 AM IST

पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला भेट देणार असून, त्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बैठकाही त्या यावेळी घेणार असून यानिमित्ताने भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच शिरूर मतदार संघातही आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या ही दौरा करणार आहेत.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ जागा करण्याची मोहीम - सीतारामन १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान भाजपच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना भेट देणार आहेत. भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

केंद्रीय नेत्याला ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त - १४४ मतदारसंघांपैकी, भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभेच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी 2 जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत. या मोहिमेसाठी भाजपने केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेत्याला ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त केले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार - डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये दाखल होतील. खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा त्या आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. धायरी येथील एका मंगल कार्यालयात खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. शिरूरचे लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत.

लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्याचे प्रयत्न निष्फळ - खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचे संकेत भाजपने या दौऱ्याद्वारे दिल्याचे मानले जाते. २०१९ मध्येच लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. मात्र, बारामतीकरांनी भाजप उमेदवाराला नाकारले. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र, देशासह राज्यात भाजपला २०१९ मध्ये चांगले यश मिळाले होते.

९ ऑगस्ट रोजी बारामतीत आढावा बैठक - यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढण्यासाठी भाजप ने दंड थोपटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या तीन दिवशीय दौऱ्याला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. सीतारामन यांच्यासमवेत दौऱ्यात विधानपरीषदेचे आमदार तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. १६ ऑगस्ट रोजी केंंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या खडकवासला, भोर येथे, १७ ऑगस्टला इंदापुर, दौंड, तर १८ ऑगस्टला त्या बारामती आणि पुरंदरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या ठिकाणी भाजपच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी दिली. तसेच या पार्श्वभुमीवर सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी बारामतीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Jagdeep Dhankhar Wins : जगदीप धनखड़ भारताचे नवे उपराष्ट्रपती.. मार्गारेट अल्वा यांचा पराभव

हेही वाचा - Faculty Unemployment : डॉक्टरेट प्राध्यापकांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ; नेट सेट धारकांचा प्रश्न गंभीर

Last Updated : Aug 7, 2022, 8:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.