ETV Bharat / city

Nirmala Sitharaman Vedanta Foxconn : मागील सरकारने राज्यात येणाऱ्या पाच मोठ्या प्रकल्पांसाठी अडथळे निर्माण केले- केंद्रीय अर्थमंत्र्यांचा आरोप

वेदांत आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा संयुक्त उपक्रम पुणे शहराजवळ उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर प्रकल्प ( joint venture semiconductor project ) गुजरातमध्ये सुरू होणार आहे. त्याची गेल्या आठवड्यात घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू ( blame game over project in MH ) आहेत.

author img

By

Published : Sep 22, 2022, 10:21 PM IST

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

पुणे - वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट ( Vedanta Foxconn semiconductor plant ) राज्यातून गुजरातमध्ये स्थलांतरित केल्याबद्द्ल टीका करणे म्हणजे मगरीचे अश्रू ढाळणे अशी टीका केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षावर केली. मागील सरकारने राज्यात येणाऱ्या पाच मोठ्या प्रकल्पांसाठी अडथळे निर्माण केले होते, असादेखील त्यांनी आरोप केला. त्या पुण्याजवळ ( Nirmala Sitharaman pune press ) एका कार्यक्रमातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

वेदांत आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा संयुक्त उपक्रम पुणे शहराजवळ उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर प्रकल्प ( joint venture semiconductor project ) गुजरातमध्ये सुरू होणार आहे. त्याची गेल्या आठवड्यात घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू ( blame game over project in MH ) आहेत. हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याबद्दल विरोधकांच्या टीकेबद्दल विचारले असता, सीतारामन म्हणाल्या की, महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवणारे लोक कोण होते? पालघर जिल्ह्यातील 65,000 कोटी रुपयांचा वाधवण प्रकल्प कोणी रोखला ? नाणार रिफायनरी प्रकल्प कोणी थांबवला? मुंबईच्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी अडथळे कोणी निर्माण केले? हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी फायदेशीर नव्हते का, असा सवालही मंत्र्यांनी केला. या सर्व प्रकल्पांचा गुजरातला फायदा झाला का? तुम्ही सत्तेत असताना एक-दोन प्रकल्प ( Union Finance Minister slammed Maha vikas Aghadi ) थांबवले नाहीत, तर पाच प्रकल्पांसाठी अडथळे निर्माण केले. आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळता आहात आणि राजकारणासाठी काहीही बोलत आहात, अशी टीका अर्थमंत्र्यांनी केली.

बारामतीचा दौरा का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याबाबत विचारले असता सीतारामन म्हणाल्या की, मी कोणत्याही कुटुंबासाठी नाही. तर पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या मतदारसंघात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

काय आहे प्रकल्प? या वर्षी जुलैमध्ये फॉक्सकॉन आणि वेदांत समूह यांच्यात एक करार झाला होता. ज्याअंतर्गत दोन्ही कंपन्या महाराष्ट्रात एकत्रितपणे 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार होत्या. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन पुण्यातील सनराईज सेमीकंडक्टर चिप आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करतील. या वर्षाच्या सुरुवातीला, वेदांता ग्रुपने फॉक्सकॉनसोबत आणखी एक करार केला आहे. या अंतर्गत ते पुढील 10 वर्षांमध्ये भारतात सेमीकंडक्टर चिप्स आणि डिस्प्लेच्या निर्मितीमध्ये 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.