ETV Bharat / city

'राफेलची पूजा केली तर काय चुकलं?, हा आमच्या श्रद्धेचा भाग' - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राफेलची पूजा करताना लिंबु मिरची चढवली तर त्यात चूक काय? ही अंधश्रद्धा नाही आमच्या श्रद्धेचा भाग आहे, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजनाथ सिंह यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.

निर्मला सीतारामन
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:46 PM IST

Updated : Oct 11, 2019, 4:39 PM IST

पुणे - महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्याबाबत विचारले असता, त्यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. तसेच राफेलची पुजा करताना लिंबु मिरची चढवली तर त्यात चूक काय? ही अंधश्रद्धा नाही तर आमची श्रद्धा आहे, असे सांगत अर्थमंत्री सीतारामन यांनी सिंह यांच्या राफेल पूजेचे आणि लिंबू-मिरची ठेवण्याच्या कृतीचे समर्थन केले.

निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद पुणे

पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना, तसेच आपल्या कृतीचे समर्थन करत असताना सीतारामन यांनी यापूर्वी देखील तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार पूजन केले होते, याची आठवण करून दिली. मात्र त्यावेळी कोणीच चर्चा केली नाही, मग आत्ताच ही चर्चा का? असा सवाल देखील उपस्थित केला.

हेही वाचा... नोबेल २०१९ : इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचे नोबेल

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामाचा आढावा घेतला. मागील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांसाठी काम केले आहे. विशेष करून पाण्याच्या विषयात मोठे काम आहे. शेती तसेच शहरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात सरकारला यश आले आहे. अजूनही काही कामे बाकी आहेत पण भाजप ते पूर्णत्वाला नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा... 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'

पंजाब महाराष्ट्र बँकेसंदर्भात रिजर्व बँकेच्या गव्हर्नसोबत बोलणे झाले आहे. तसेच ठरलेल्या प्रक्रियेनुसार योग्य ती कार्यवाही होईल. मात्र ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी विनंती आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुरग्रस्त कोल्हापूर, सांगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबत निकष ठरलेले आहे. त्यानुसार नुकसानधारकांना मदत उपलब्ध होईल त्यात कोणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या आहेत. मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांमधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी, त्या संदर्भातील कायद्यात सुधारणा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Intro:राफेल ची पूजा केली तर काय चुकलं, हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे, निर्मला सीतारामनBody:mh_pun_01_nirmala_sitaraman_in_pune_avb_7201348

anchor

राफेल ची पूजा करताना लिंबु मिरची चढवली तर त्यात चूक काय ? ही अंधश्रद्धा नाही आमची श्रद्धा आहे असे सांगत अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल समोर पूजा आणि लिंबू मिरची ठेवण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे यापूर्वी देखील तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार पूजन केले होते त्यावेळी मात्र कोणी चर्चा केले नाही आत्ताच ही चर्चा का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्री निर्मला सीतारामन पुण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामाचा आढावा घेतला मागील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांसाठी काम केलं। विशेष करून पाण्याच्या विषयात मोठं काम आहे। शेती तसेच शहरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश आलाय। अजूनही काही काम बाकी आहे पण आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ असे त्या म्हणाल्या...पंजाब महाराष्ट्र बँकेसंदर्भात रिजर्व बँकेच्या गव्हर्नसोबत बोलणे झाले आहे ठरलेल्या प्रक्रियेनुसार योग्य ती कार्यवाही होइल मात्र ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी विनंती मी केली आहे असे देेखील त्यांनी
सांगितले त्याच प्रमाणे पुरग्रस्त कोल्हापूर सांगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबत निकष ठरलेले आहे त्यानुसार मदत उपलब्ध होईल त्यात कोणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असे सीतारामन यांनी यावेळी सांगितले
मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांमधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी याविषयी या कायद्यात सुधारणा आणणार असल्याचे त्या म्हणाल्या...कलम 370 हा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा विषय आहे, महाराष्ट्रात कलम 370 बाबत का बोलता असे विचारणार्याचे आश्चर्य वाटते असे देखील त्या म्हणाल्या
Byte निर्मला सीतारामन, अर्थमंत्रीConclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.